Mandirat Antarat Marathi Bhakti Geet Lyrics

मंदिरात अंतरात तोच नांदताहे
नाना देही नाना रूपी तुझा देव आहे

तोच मंगलाची मूर्ती, तोच विठ्ठलाची कीर्ती
तोच श्याम, तोच राम, दत्तधाम आहे

संतांचिया कीर्तनात, साधकांच्या चिंतनात
तोच ध्यास, तोच आस, तोच श्वास आहे

तोच बाल्य, तारुण्यही, वार्धक्याचा विश्रामही
तोच ऐल, तोच पैल, आदि अंत आहे

गीत – सुधीर मोघे
संगीत – सुधीर फडके
स्वर – सुधीर फडके
चित्रपट – धाकटी सून