Dehachi Tijori Marathi Bhakti Geet Lyrics

देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा,
उघड दार देवा आता, उघड दार देवा ।। धृ ।।

पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची,
मनीं चोरट्याच्या का रे भीती चांदण्याची
सरावल्या हातांनाही कंप का सुटावा ।। १ ।।

उजेडात होते पुण्य अंधारात पाप,
ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप
दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा ।। २ ।।

स्वार्थ जणु भिंतीवरचा, आरसा बिलोरी
आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी
घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा ।। ३ ।।

तुझ्या हाती पांडुरंगा तिजोरी फुटावी
मुक्तपणे भक्ती माझी, तुझी तू लुटावी
मार्ग तुझ्या राउळाचा, मला आकळावा ।। ४ ।।

भलेपणासाठी कोणी बुरेपणा केला
बंधनात असुनी वेडा जगी मुक्त झाला
आपुल्याच सौख्यालागी करील तो हेवा ।। ५ ।।
उघड दार देवा आता, उघड दार देवा

देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा,
उघड दार देवा आता, उघड दार देवा ।। धृ ।।