Dev Majha Vithu Savla Marathi Bhakti Geet Lyrics देव माझा विठू सावळा माळ त्याची माझिया गळा विठु राहे पंढरपूरी, वैकुंठच हे भूवरी भीमेच्याकाठी डुले भक्तीचा मळा साजिरे रूप सुंदर, कटि झळके पीतांबर कंठात तुळशीचे हार, कस्तुरी-टिळा भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो रंगुन जाई भक्तांचा पाहुनी लळा गीत – सुधांशु संगीत – दशरथ पुजारी स्वर – सुमन कल्याणपूर