Yogi Pavan Manacha Abhang Lyrics in Marathi

योगी पावन मनाचा
साही अपराध जनाचा ॥१॥

विश्व रागे झाले वन्ही
संते सुखे व्हावे पाणी ॥२॥

शब्द शस्‍त्रे झाले क्लेश
संती मानावा उपदेश ॥३॥

विश्वपट ब्रह्म, दोरा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥

– संत मुक्ताबाई