Jyacha Sakha Hari Abhang Lyrics in Marathi ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करीं ॥१॥ उणें पडों नेदी त्याचें वारें सोसी आघाताचें ॥२॥ तयावीण क्षणभरी कदा आपण नव्हे दुरी ॥३॥ आंगा आपुले ओढोनी त्याला राखतो निर्वाणीं ॥४॥ ऐसा अंकित भक्तांसी म्हणे नामयाची दासी ॥५॥ -संत जनाबाई