Aamha Na Kale Dnyan Abhang Lyrics in Marathi आम्हा नकळे ज्ञान न कळे पुराण वेदाचें वचन नकळे आम्हा ॥१॥ आगमाची आढी निगमाचा भेद शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा ॥२॥ योग याग तप अष्टांग साधन नकळेची दान व्रत तप ॥३॥ चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा गाईन केशवा नाम तुझें ॥४॥ – संत चोखामेळा