Vitthal Vitthal Gajari Gajari Abhang Lyrics in Marathi विठ्ठल विठ्ठल गजरी गजरी अवघी दुमदुमली पंढरी ॥१॥ होतो नामाचा गजर दिंड्या पताकांचा भार ॥२॥ निवृत्ती ज्ञानदेव सोपान अपार वैष्णव ते जाण ॥३॥ हरि कीर्तनाची दाटी तेथें चोखा घाली मिठी ॥४॥ – संत चोखामेळा