रूपे सुंदर सावळा गे माये
वेणु वाजवी वृंदावना गोधने चारिताहे ॥१॥
रुणझुण वाजवी वेणु
वेधी वेधले आमुचे तनमनु ओ माये ॥२॥
गोधने चारी हती घेऊन काठी
वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी ।
वैकुंठीचा सुकुमार गोधने चारीताहे ॥३॥
एका जनार्दनी भुलवी गौळणी
करीती तनुमनाची वोवाळणी वो माये ॥४॥
