Kanada Vitthal Abhang Lyrics in Marathi

कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल
कानडा विठ्ठल विटेवरी ॥१॥

कानडा विठ्ठल नामें बरवा
कानडा विठ्ठल हृदयीं घ्यावा ॥२॥

कानडा विठ्ठल रूपे सावळां
कानडा विठ्ठल पाहिला डोळां ॥३॥

कानडा विठ्ठल चंद्रभागे तटी
कानडा विठ्ठल पहावा उठाउठी ॥४॥

कानडा विठ्ठल कानडा बोले
कानड्या विठ्ठलें मन वेधियेलें ॥५॥

वेधियेलें मन कानड्यानें माझें
एका जनार्दनीं दुजें नाठवे चि ॥६॥

– संत एकनाथ