Amrutahuni God Abhang Lyrics in Marathi

अमृताहुनि गोड नाम तुझें देवा
मन माझें केशवा कां बा नेघे ॥१॥

सांग पंढरिराया काय करुं यासी
कां रूप ध्यानासि नये तुझें ॥२॥

किर्तनीं बैसतां निद्रे नागविलें
मन माझें गुंतलें विषयसुखा ॥३॥

हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ति
नये माझ्या चित्तीं नामा म्हणे ॥४॥

– संत नामदेव