Tirtha Vitthal Kshetra Vitthal Abhang Lyrics in Marathi तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल ॥१॥ माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल ॥२॥ गुरू विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल ॥३॥ नामा म्हणे मज विठ्ठल सांपडला ह्मणोनी कळिकाळां पाड नाहीं ॥४॥ – संत नामदेव