Pandharichi Vari Jayachiye Kuli Abhang Lyrics in Marathi पंढरीची वारी जयाचिये कुळीं त्याची पायधुळी लागो मज ॥१॥ तेणें त्रिभुवनीं होईन सरता नलगे पुरुषार्था मुक्ति चारी ॥२॥ नामाची आवडी प्रेमाचा जिव्हाळा क्षण जीववेगळा न करीं त्यांसी ॥३॥ नामा म्हणे माझा सोयरा-जिवलग सदा पांडुरंग तया जवळीं ॥४॥ – संत नामदेव