मोठ्ठा पेच पडलाय शेतकऱ्यांना कठीण आहे औंदा सोसायटी फिटायला
पाणीच नाही विहिराला पण लाईट बिल मात्र येतंय वेळच्या वेळेला
कोण जाणे पाझर कधी फुटेल राज्य आणि केंद्र सरकारला
पैसा नाही सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्ज माफीला
लागू करा सातवा वेतन आयोग कर्मचारी वर्गाला
उत्पादन खर्चावर आधारित भाव का देत नाही शेतकऱ्याच्या पिकला
जाग्या करा भावना नाहीतर परवानगी द्या आत्महत्या करून मारायला
लाजा कशा वाटत नाहीत शेतकऱ्यांच्या मतदानावर निवडून यायला
ट्याक्स माफ करता उद्योग धंद्याला आणि हात आखडता घेत शेती उद्योगाला
खुर्ची साठी ओरडून सांगत होता न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्याला
मग आता काय झालं तुमच्या निर्णय क्षमतेला भावनिक साद घालून शेतकरी नेला अधोगतीला
उद्योगपतींसाठी शेतकऱ्यांची शेत जमीन काढतात विक्रीला
परमेश्वर तर नक्कीच माफ करणार नाही तुमच्या बौद्धिक दिवाळखोरीला
मोठ्ठा पेच पडलाय शेतकऱ्यांना कठीण आहे औंदा सोसायटी फिटायला
Kavi – Unknown
