टीव्हीवाले साहेब तुम्हाला दाखवायचं ते दाखवा
पण पठारभागाचं रडगाणं टीव्ही वरती दाखवा
जपान दाखवा, जर्मनी दाखवा, ब्राझील अन इटली दाखवा
पण भाव नसलेली आमची दुधाची किटली पण दाखवा
मोदी दाखवा, कोट दाखवा, रिजर्व बँकेच्या नोट दाखवा
पण उपाशी आमच्या जनावराचे साहेब फक्त पोट दाखवा
सिनेमा दाखवा, खाडी दाखवा, नेत्यांसोबतची मादी दाखवा
पण बैलाविना पडलेली चाबकाची वादी दाखवा
डान्स दाखवा, नाच दाखवा, ठेक्या वरच्या लावण्या दाखवा
पण तारमळलेल्या जनावरांना नसलेल्या छावण्या दाखवा
रामायण दाखवा, महाभारत दाखवा, बायबल अन कुरण दाखवा
पण पाण्या विना पेटलेलं पठार भागाचं सरान दाखवा
टीव्हीवाले साहेब तुम्हाला दाखवायचे ते दाखवा
पिच्यर ची फाईट दाखवा, साहेबांची ऐट दाखवा
पण आमच्या शेतकऱ्यांची शेतात पाणी भरण्याची नाईट पण दाखवा
Kavi – Unknown
