कधी ती पायात लुडबुडणारी मांजर असते
कधी ती लाडिक चाळे करणारी प्रेयसी असते
कधी ती अटीतटीने भांडणारी विरुद्ध पार्टी असते
कधी समजून घेणारी मित्र असते
कधी त्रास देणारी डोकेदुखी असते
कधी मस्का लावणारी असते
कधी जवळ असावी असे वाटताना गैरहजर असते
आणि कधी नको असताना जवळ असते
कधी न सांगता समजून घेते
कधी गैरसमज करून घेते
कधी मुलांची काळजी करते
कधी स्वतःच्या रूपाची तारीफ करते
कधी नवऱ्याला नावे ठेवते
कधी नवऱ्याचा पगार वाढवून सांगते
कधी हट्टाऊन हौस पुरवून घेते
कधी हौसेने नवीन पदार्थ करून खायला देते
कधी शॉपिंगने बेजार करते
कधी नवऱ्यासाठी कौतुकाने काहीतरी खरेदी करते
कधी कोणाची गुपित सांगते
कधी कोणाला कळू ना देता गुपचूप कारभार उरकते
कवी : UNKNOWN
