Baher Karto Sai Sai

बाहेर करतो साई साई
घरात रडते तुझी आई

सर्वांना करतो साईराम
आईला करायला लावतो घरचं काम

मंदिरात लावतो साईंना दिवा
घरात देतो आईला शिव्या

साईला स्वतःचे जग मानतो
घरी आईला लाथेने हाणतो

जो आईचा नाही झाला तो सईचा काय होणार
अशाने तुला साई पण जवळ नाही घेणार

आईचे आटवतो रक्त
म्हणे मी सईचा भक्त

साई पण सांगून गेले, ज्याने आईचे सत्कर्म केले
त्यास मी स्वर्गात नेले

म्हणून बंधूंनो आईकडे लक्ष द्या
साई तुमच्याकडे लक्ष देईल

कवी : UNKNOWN