Itar Divsansarkha Asto Ha Divas

ईतर दिवसांसारखाच असतो हा ही दिवस
तसाच उगवतो अन तसाच मावळतो

तरीही त्यावर असतो
नव्या नवतीचा तजेला

या दिवशी उगवणारा सूर्य घेऊन येतो
आशेच्या नव्या किरणांचा नजराणा

त्यावर असते नवीन वर्षाची नव्हाळी
अन सोनेरी स्वप्नांची झळाळी

म्हणूनच ईतर दिवसांसारखाच नसतो हा दिवस
तो असतो नव्या वर्षाचा आरंभ
नव्या स्वप्नांचा प्रारंभ

कवी : UNKNOWN