लग्न लग्न ते काय असे हे झाल्यावाचून कलेचं ना
म्हणती जैसे स्वर्ग कधीही मेल्यावाचून दिसेच ना
करूया आता लग्न म्हणुनी मुलगी काही मिळत नसे
तिच्या शोधात होतो आणिक मलाच ती स्वप्नी दिसे
लग्न स्वप्न जागेपणी पडते, झोप उडवते, मना ग्रासते
लग्न-ध्यास अन लग्न-पूर्ती मग आयुष्याचे इस्पित होते
लग्न या विषयावरी सल्ले नुसतेच ऐकायचे
जगणे कितीही समजावले करून असते पाहायचे
लग्न हे जणू उद्धिष्ट की ज्यावर ना काही पर्याय
विघ्न, विघ्न अन विघ्न आहेत सुचवा मला काही उपाय
खळखळून सोबत हसणारी रागवून मग रुसणारी
मुलगी मिळे ना एखादी आनंदाने मला स्वीकारणारी
काळी नाकटी जरी चुकून हसली अप्सरा ती मज वाटे
तिचाही मग नकार मिळता तिळा तिळाने जीव तुटे
मिलन, संगत, अतूट नते गुण लग्नाचे किती वर्णावे
स्वातंत्र्यातील सुख हे पारतंत्राशिवाय कसे कळावे
