तुझी आठवण येते तेव्हा सोबत गंध येते घेवून
हरवलेल्या काही क्षणांना रंग प्रीतीचा जाते देवून
तुझी आठवण येते तेव्हा उर येत भरून डोळ्यात येते पाणी
आणि मनात उमटतात तुझ्या आठवणींची गाणी
तुझी आठवण येते तेव्हा उगाच जीव तुटतो
न राहवून सुद्धा जुन्या आठवणीत जीव घुसमटतो
तुझी आठवण येते तेव्हा मस्त करतो सिगरेटचा एक झुरका
तुझा चेहरा मात्र धुरात सुद्धा माझ्यासाठी पोरका
कवी : UNKNOWN
