वाटत नव्हते कोणासही ऐसे अघटित घडून येईल
चालता – बोलता तुला दैव ऐसें नेईल
माणुसकी, स्नेह, आधार, मायेची ज्या ज्या वेळी चर्चा होईल
त्या त्या वेळी सर्वांना पहिली आठवण तुझी येईल

साथ सुटली लाखमोलाची । छाया आटली वटवृक्षाची ।।
गेला आधारवड आमचा । हरवले गंध प्रेमाचे ।।
शांती लाभो तुमच्या आत्म्यास । हिच विनंती परमेश्वरास ।।
कष्टाने संसार थाटला पण राहिली नाही साथ आम्हाला,
आठवण येते प्रत्येक क्षणाला, आम्ही तुमची वाट पाहतो
यावे पुन्हा जन्माला

ऑफीसात माझ्यापासून अगदी मोजल्यास चार हात लांब बसणारा माझ्याच वयाचा एक मित्र अनपेक्षितपणे वय नसतानाही गेल्याचं कळालं… कालच तो माझ्यासमोर होता… अरे आम्ही बोललो…अरे काल निघताना बोललोय मी त्याच्याशी….मीही बोललो…त्या सगळ्यांशी झालेल्या संवादात आम्ही सगळेच होतो… पण मुद्दलातला ‘तो’ च नव्हता…
आपण सगळेच या सगळ्यात असतो… कधी कधी नसतोही…. आपण मोजलं तर आपण सगळेच एकमेकांपासून या चार हातांपेक्षाही चार शब्दांनी लांब असतो.. नसतोही … प्रत्येकासोबतचा प्रत्येक क्षण जपा...
XXXXXX मित्रा तुझ्या आत्म्याला शांती लाभो…
-Sachin Shahaji Kakade
शून्यामधूनी विश्व् निर्मूनी, कीर्तीसुगंध वृक्ष फुलवूनी
लोभ, माया, प्रीती देवूनी सत्य सचोटी मार्ग दावूनी
अमर जाहला तुम्ही जीवनी

लोक म्हणतात की,” एक जन गेल्याने दुनिया संपत नाही किंवा थांबत नाही
पण हे कोणालाच कसे कळत नाही, की लाख लोक मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही
भावपूर्ण श्रद्धांजली
जे झाले ते खूप वाईट झाले. यावर विश्वासच बसत नाही. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो
खरोखर ही खूप वाईट घटना आहे. एवढ्या कमी वयात याचे जाणे खूपच दुःखदायक आहे. यांच्या परिवाराला यांची आठवण नेहमीच येत राहील. माझी विनम्र श्रांधजली
जाणारे आपल्यानंतर एक अशी पोकळी निर्माण करून जातात ती भरून काढणे कधीही शक्य नसते. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
बोट सुटले हातून जरी, सावली अजून खांद्यावरी,
वात्सल्याचा राहो सदा, आशिर्वाद आम्हांवरी!

