रसाळ उसाचे पेर
कोवळा हुरडा अन बोर
वांगे गोंडस गोमटे
टपोरे मटार पावटे
हिरवा हरभरा तरारे
गुलाबी थंडीचे शहारे
वर तिळदार अन बाजर
गोड ताठ ते गाजर
वरती लोण्याचा गोळा
जिभेवर रसवंती सोहळा
सर्वांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा
एवढासा तीळ त्याला महत्त्व केवढं
लपलंय प्रेम आभाळाएवढं
तिळावर फुलतो हलव्याचा काटा
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा
संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा
दिवस संक्रांतीचा मधुर वाणीचा
रंग उडत्या पतंगाचा बंध दाटत्या नात्यांचा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या
मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या
या संक्रांतीला तिळगुळ खाताना
आमची आठवण राहूद्या
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहीकडे शिंपावे
सुखाचे मंगल क्षण आपणास लाभावे
श्री लक्ष्मी नारायण घरी तुमच्या यावे
शुभेच्छाने अवघे आंगण तुमचे भरावे
दुःख असावे तिळासारखे
आनंद असावा गुळासारखा
जीवन असावे तिळगुळासारखे
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा

आज दिनांक १४ जानेवारी पासून सूर्य आश्लेषा नक्षत्रापासून मकर राशीत प्रवेश करत आहे
आणि याच दिवसापासून प्रत्येक दिवस तीळ तीळ वाढत जाणार
तशीच आपले यश कीर्ती धनलक्ष्मी वाढत जावो आणि सर्व परिवारास निरामय स्वास्थ लाभो
ह्याच संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा
कणभर तीळ, मन भर प्रेम
गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा

रसाळ उसाचा पेर, कोवळा हुरडा अन बोर
वांगे गोंडस गोमटे, टपोरे मटार पावटे
हिरवा हरभरा तरारे, गोड थंडीचे शहारे
गुलाबी ताठ ते गाजर, तीळ दार अन ती बाजर
वर लोण्याचा गोळा, जिभेवर रसवंती सोहळा
डोळे उघडता हे जड, दिसे इवल्या सौख्याचे सुगड
भोगीच्या हार्दिक शुभेच्छा
कृपा करून तीळ गूळ घरी आणून द्या
फोटो टाकू नका. मोबाईल चिकट होऊन मुंग्या लागत आहेत
तिळगुळ हवंय पण त्यापेक्षा तुमची गॉड “मैत्री” हवी आहे
कधीही न संपणारी
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
विसरून सर्व कटुता हृदयात तिळगुळाचा गोडवा यावा
दुःखे हरावी सारी अन आयुष्य सुखाचा सोहळा व्हावा
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

परक्यांनाही आपलंस करतील असे काही गोड शब्द असतात
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात
अशाच गोड माणसांना व त्यांच्या परिवाराला मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा
