बंधन असूनही बंधन हे थोडेच, या तर हळव्या रेशीमगाठी
राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे, राखी एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेल
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी देत आहे
Raksha Bandhan Messages in Marathi
तुझी आठवण येता मन भरून रे येते
तुला पाहण्याची आस माझ्या मनात तेवते
नाते बहीण भावाचे आहे खूप प्रेमाचे
मोगऱ्याच्या गंधासम नित्य मनी जपायचे
तुज लाभो यश कीर्ती हेच मागणे मागते
आजच्या या शुभ दिनी गणेशाला विनवते
सण आजचा वर्षाचा आहे रक्षाबंधनाचा
नेत्रांच्या निरांजनाने भावास ओवाळण्याचा
कृष्ण जसा द्रौपदीस तसा लाभला तू मला
ओवाळते भाऊराया औक्ष माझे लाभो तुला
असा आनंद सोहळा तुजविण सुना सुना
इथुनी ओवाळीते मी समजूनी घे भावना
Rakshabandhan Marathi Whatsapp
नाते हे प्रेमाचे नितळ अन निखळ मी सदैव जपलंय
हरवलेले ते गोड दिवस आणि आठवणी आज सारं आठवलंय
हातातल्या राखीसोबतच ताई तुझं प्रेम मनी मी साठवलंय
धागा नाही हा नुसता, विश्वास तुझ्या माझ्यातला
आयुष्यात कुठल्याही क्षणी, कुठल्याही वळणावर, कुठल्याही संकटात
हक्काने तुलाच हाक मारणार आहे
विश्वास आहे माझा तुझ्यावरचा
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णासारखा
तू माझ्या हातावर बांधलेल्या राखीची ही गाठ
आपल्यातील नातं आणि विश्वास धृढ करो
तुझं विश्व आनंदाने भरो …
Raksha Bandhan Quotes in Marathi
तुझ्या दीर्घायुष्याचा आणि अक्षय सुखाच्या लक्षावधी प्रार्थना या रक्षाबंधनानिमित्त
तू माझी बहीण म्हणून जन्माला आलीस ती केवळ याचसाठी
प्रसंगी मला समजून घेऊन माझा उत्साह वाढवण्यासाठी
सगळा आनंद सगळे सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्तता
यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य हे तुला मिळू दे
हे रक्षाबंधन आपल्या नात्याला एक नवा उजाळा देऊ दे
