तू दिसत नसलास तरी
वाचत असतोस मला
का दूर राहून असा
छळत असतोस मला
हवी तुलाही मीच तरी
टाळत असतोस मला
ध्यानी मनी अन स्वप्नी
घोळत असतोस मला
का दूर राहून असा
छळत असतोस मला
न उमगला कोणाला तू
कळत असतोस मला
हरघडी मनात माझ्या
भासत असतोस मला
का दूर राहून असा
छळत असतोस मला
