Tiche Mehandiche Haat

आज तिचे मेहंदीचे हात मला दाखवून रडली
आता मी कोणा दुसऱ्याची आहे हे सांगून रडली

पहीले खूप बोलायची, “नाही जगू शकत मी तुझ्याविना”
आज तेच पुन्हा पुन्हा सांगून रडली

कसा संशय घेऊ तिच्या प्रेमावर मित्रांनो?
आज ती भर बाजारात माझ्या खांद्यावर डोके ठेऊन रडली

आज तिचा फोन आला, शब्दांऐवजी हुंदक्याचा आवाज आला
स्वतःला सावरून ती म्हणाली, “अरे माझे लग्न ठरले”

ती सावरली, पण तो ढासळला
आणि मग दोघांच्या असावांपुढे पावसाचा वर्षाव कमी वाटू लागला

शब्द सर्व हवेत विरले. ती म्हणाली, “माफ करशील ना मला?”
तो म्हणाला, “माफी कसली मागतेस अपराध्यासारखी?
कर्तव्यपूर्ती करून आई बाबांचा मान राखालास तू”

या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी होशील नक्की माझी
ऐकून ती म्हणाली “आठवणीत आणि हृदयाच्या कोपर्यात असशील नेहमी”

धीर धरून त्याने फोन ठेवला
कुणाला अश्रू दिसू नये म्हणून पावसात जाऊन बसला

कवी – अज्ञात