माहिती नाही का पण आज खुप रडाव वाटतंय
आईच्या कुशीत जावून झोपाव वाटतंय
धावपळीच्या जीवनात सुटली अनामोल नाती मागे
माहिती नाही का आज ती सगळी नाती पुन्हा एकदा जोडावी वाटतंय
आणि खुप खुप रडाव वाटतंय
केंव्हातरी ह्या गर्दी मध्ये गवसल होत कोणी माझं
माहिती नाही का आज त्याला परत शोधून आणावं वाटतंय
आणि खुप खुप रडाव वाटतंय
रोज स्वप्नातच जगते मी
माहिती नाही का आज त्या स्वप्नांना दूर सारून वास्तवात यावं वाटतंय
आणि खुप खुप रडाव वाटतंय
रोज स्वता:शी खोट बोलते मी
माहिती नाही का आज स्वत:ला सगळ खर सांगव वाटतंय
आणि खुप खुप रडाव वाटतंय
माहिती नाही का तुटलेल सार पुन्हा परत जोडाव वाटतंय
आणि खुप खुप रडाव वाटतंय
माहिती नाही का पण खुप खुप रडाव वाटतंय
