नाऊ लाख डोनेशन देणे कबुल झाले
हातात खडू घेऊन मास्तर रुजू झाले
घरातल्या घरात भांड्याला भांडं थटू लागलं
माय लेकरांचे प्रेम दुधासारखं आटू लागलं
सासू सासऱ्याशी पटेना मैडम म्हणाल्या वेगळं राहू
चार गुंठे, फ्लॅट हफ्त्या हफ्त्यात घेवू
सोसायटीचे दहा लाख, पंचवीस लाख गृह कर्ज
रंग – रंगोटी साठी पुन्हा पतसंस्थेत अर्ज
इतका देखणा बंगला साधी पूजा चालेल कशी
नात्यागोत्यांच्या नाकावर बसू नये माशी
चार चाकीशिवाय बंगला काय शोभत नाही
थोडे कर्ज वाढले म्हणून बंगला काय डूबत नाही
आंधळा विचार मैडमचा कसा दिसेल धोका
तटाखालच्या मांजराचा झालाच नाही बोका
बघता बघता घरात तीनदा हलला पाळणा
चुकला हिशोब खर्चाचा घेतला नाही खेळणा
व्याज हफ्ता कर्ज गणित काय जमेना
मास्तरच मन वर्गात सुद्धा रमेना
हातात किती पगार सांगायची लाज वाटते
पूर्वी फुटायची बियर आता फक्त देशी फुटते
उपवर मुलगी लग्नाची पुन्हा झुकली मान
सोयर्यांसाठी पायपीट फाटून गेली वहान
आज मास्तर सेवा मुक्त कर्ज फेडण्यात गेली हयात
आज साठी गाठली, दोन्ही पोरांनी हळूच रक्कम फंडाची लाटली
सुख समाधान शांतीसाठी देवळात जाऊन बसतात
काय कमावले आयुष्यात हिशोब करत असतात
मांडीवर घेऊन नातवाला मास्तर संगे कहाणी
एका डोळ्यात हासू दुसऱ्या डोळ्यात पाणी
