Vaat Kahi Baghvat Nahi

कधी भेटशील मला
वाट आता बघवत नाही
या स्वप्नांच्या शहरात
तुझ्या विना राहवत नाही

वाटते भेटावे लगेच तू मला
पण गाठ काही पडत नाही
असशील इथेच कुठे तरी
पण तरी का सापडत नाही

तुझे स्वप्न बघावे म्हटलं
तरी झोप का लागत नाही
रात्रभर तुझाच विचार
तुझ्या शिवाय काही सुचत नाही

पुरे झाला हा खेळ आयुष्याचा
वाट आता बघवत नाही
कधी भेटशील मला
आता वाट काही बघवत नाही

कवी : प्रियांका