आई – बाळा एक ग्लास पाणी घेऊन ये रे
रवी – देशाला स्वतंत्र मिळाले आहे, मी काही गुलाम नाही
आई – गाढवा, तू दूध माघ मग मी सांगते
मम्मी तू पप्पांना ऑक्शन कधी करणार?
ऑक्शन नाही रे गाढवा, औक्षण
शिक्षक : चिंटू तूला १० वी त ९४ % मार्क्स मिळाले त्याचे रहस्य काय ?
चिंटू : त्याचे श्रेय मि माझ्या आई बाबांना देतो, कारण आई बाबा सतत व्हाट्सएप आणि फेसबूक वर असल्यामूळे घरात भांडणे होत नव्हती आणि त्यामूळे मी शांतपणे अभ्यास करु शकलो.
बाबा – येवढे कमी मार्क्स ?? दोन कानाखाली लावल्या पाहिजे
गण्या– हो बाबा, चला लवकर, मी तर मास्तरचं घर पण बघुन ठेवलय
शिक्षक : उशीर का झाला शाळेत यायला?
चिंटू : आई बाबा भांडत होते
शिक्षक : त्याचा उशिरा येण्याशी काय संबंध?
चिंटू : माझा एक बूट आईच्या आणि दुसरी बाबांच्या हातात होता
Jokes in Marathi for Children
एकदा पाच मांजरी एका रिक्षेत शिरतात
रिक्षावाला म्हणतो, “इतके लोक रिक्षेत नाही मावणार”
तर त्या मांजरी काय म्हणाल्या? विचार करा… अरे विचार काय करताय?
सोप्पय उत्तर. त्या म्हणाल्या, “माऊ माऊ”
५ मुलांना एका बाईक वर पाहून ट्राफिक पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला.
एक मुलगा म्हणाला, “आधीच पाच जण बसलेत… तुम्ही कुठे बसणार?”
गुरुजी : औषधांच्या गोळ्यांचे पाकीट १० गोळ्यांचेच का असते? आणि ही पध्दत कधी पासून सुरु झाली?
मनोज : रावनाला डोकेदुखी सुरू झाली तेव्हा पासुन
मुलगा : आई मी मित्राकडे खेळायला जाऊ?
आई : बाबांना विचार.
मुलगा : बाबा मी मित्राकडे खेळायला जाऊ?.
बाबा : आईला विचार
मुलगा : च्यायला, हे घर आहे की तलाठ्याचं ऑफिस
Marathi Jokes for Child
मनोज : आरे रवी तू सामोसा मधील आतील भाजीच का खात आहेस?
रवी : कारण माझी आई म्हणते बाहेरचं काही खाऊ नये
बंड्या : मी दहा दिवस झोपलो नाही
गण्या : का बरं ?
बंड्या : अभ्यास करण्यासाठी
गण्या : असं कसं जमलं तुला ?
बंड्या : अरे, मी रात्री झोपायचो ना
सुरेश : काल रात्री मी इतिहासाच्या पुस्तकावर दहा तास घालवले
रमेश : काय, दहा तास ?
सुरेश : हो, रात्री पुस्तक उशाला घेऊनच झोपलो होतो
एक गोंडस मागणी….
एक छोटासा मुलगा आईवर चिडून घराबाहेर बसला होता
बाबा म्हणाले, “काय झालं बाळा?”
मुलगा : तुमच्या बायकोशी माझे पटत नाही. मला माझी बायको पाहिजे… विषय संपला
Funny Jokes in Marathi for Kids
पिंट्या : काका डेटॉल साबण आहेत का?
दुकानदार (नाकातून बोटे काढत) : हो बाळा, आहेत
पिंट्या : तर मग डेटॉल साबणाने हात धुऊन क्रीमरोल द्या बघू एक
पप्पू : मम्मी मी उद्यापासून शाळेत नाही जाणार
मम्मी : का रे, आज परत पार खाल्ला काय?
पप्पू : अगं समजत नाही त्या टीचर स्वतःला काय समजतात
मम्मी : असं काय झालं?
पप्पू : टीचर ने स्वतः फळ्यावर लिहिलं “महाभारत” आणि विचारलं “महाभारत कुणी लिहिलं”. मी म्हटलं तुम्ही, तर त्यांनी मला खूप मारलं
एकदा एका कावळ्याने बंड्याच्या डोक्यावर शी केली.
बंड्या (चिडून ओरडतो) : तू चड्डी नाही घालत का रे ?
कावळा : तू चड्डीतच करतो का रे ??
ब्रूसलीच्या आईचे नाव काय? – माऊ ली
मोठ्या बहिणीचे नाव काय? – थोर ली
लहान बहिणीचे नाव काय? – धाक ली
मनोज : हा शर्ट छान दिसतोय.
रवी : पण माझा नाही.
मनोज : हा कोटही छान दिसतोय.
रवी : पण माझा नाही.
मनोज : मग तुझे काय आहे?
रवी : लॉन्ड्री…
मुलांसाठी मजेदार मराठी जोक्स
मुलांच्या जगात आनंद, उत्सुकता आणि कल्पनाशक्तीची एक वेगळीच दुनिया असते. त्यांना हसवणारी छोटीशी गोष्ट, मजेशीर चित्र किंवा एखादा साधा जोकही त्यांच्या दिवसात खूप आनंद भरून टाकतो. म्हणूनच Marathi Jokes for Kids हा प्रकार मुलांमध्ये खूप लोकप्रिय आहे. सरळ, निरागस आणि विनोदाने भरलेले हे जोक्स मुलांना केवळ हसवत नाहीत, तर त्यांची विचारशक्ती आणि कल्पनाशक्ती वाढवतात.
या पानावर आम्ही खास मुलांसाठी कार्टून शैलीतील, स्वच्छ आणि निरागस मराठी जोक्स एकत्र केले आहेत. हे जोक्स वाचताना मुलांना मजा येतेच, शिवाय त्यांना शब्दखेळ आणि बुद्धिमत्तेची गोड ओळखही होते. पालकांनी मुलांसोबत वाचण्यासाठी, WhatsApp ग्रुपमध्ये शेअर करण्यासाठी किंवा कथा–वेळेला वाचून दाखवण्यासाठी हे जोक्स अगदी परफेक्ट आहेत.
