
सौभाग्यकांक्षिणी करतात गौरईची पुजा,
…. रावांचे नाव घेऊन घेते मी रजा
पुण्यकर्म केले असता राहतात जन्मो जन्मीच्या गाठी,
…. रावांचे नाव घेऊन जाते मी ग़ौरी पुजनासाठी
हंसराज पंक्षी दिसतात हौशी,
…. रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी
अंबाबाईच्या देवळात हळदी कुंकुवाच्या राशी
…. रावांच नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी
मंगलागौरचा सण, आनंदाची शान
माझे (नाव) आहेत माझ्या जगण्याची ओळख महान.
मंगळागौरीपुढे लावली समईची जोडी,
….रावांमुळे मला मिळाली जीवनाची अवीट गोडी
सूर्यबिंबाचा कुमकुमतिलक, पृथ्वीच्या भाळी
…रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्या वेळी
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने
मंगळागौरीच्या दिवशी…रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने
सौभाग्यवतीचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे
….. रावांचे नाव घेते मंगळागौरी देवीच्या पुढे
सुखसमाधान तिथे जिथे लक्ष्मीचा वास
मंगळगौरीच्या दिवशी देते….रावांना जिलबीचा घास
आंब्याच्या वनराईमध्ये कोकिळेचे गुंजन…
रावांचे नाव घेते आणि करते मंगळागौरीचे पूजन
मंगळागौरी माते, नमन करते तुला
….रावांचे नाव घेते, अखंड सौभाग्य लाभो मला
मंगळागौरीला पुजल्या आहेत सौळा पत्री
…रावांची मी आहे कुशल गृहमंत्री
गजाननाची कृपा, गुरूंचा आशिर्वाद
…रावांचे नाव घ्यायला मंगळागौरीच्या दिवशी करते सुरुवात
Marathi Mangalagaur Ukhane
मंगलागौर हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील परंपरेचा सण. या सणात घेतले जाणारे उखाणे हा महिलांच्या आनंदाचा आणि विनोदाचा एक सुंदर भाग असतो. येथे तुम्हाला पारंपरिक, आधुनिक, विनोदी आणि खास निवडलेले मंगलागौर उखाणे एकाच ठिकाणी मिळतील.
मंगलागौर सण हा विवाहित आणि नववधू महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे. या दिवशी केले जाणारे खेळ, फुगड्या आणि उखाणे हा या सणाचा आकर्षक भाग मानला जातो. मंगलागौर उखाणे हे केवळ नावे घेण्यासाठी नसून, भावनांचे, प्रेमाचे आणि संस्कृतीचे सुंदर दर्शन घडवतात. पारंपरिक ओवी, ताल, छंद आणि नाद यांच्या मिश्रणाने तयार झालेले हे उखाणे महिलांच्या उत्साहात रंग भरतात.
या पेजवर आम्ही पारंपरिक मंगलागौर उखाणे, विनोदी उखाणे, नववधूसाठी खास उखाणे, आधुनिक शैलीतील उखाणे आणि सोपी लक्षात राहणारी उखाणे अशा विविध प्रकारांमध्ये सुंदर संकलन दिले आहे. प्रत्येक उखाण्यात मराठी संस्कृतीची झलक आणि मंगलागौरच्या उत्साहाचे प्रतिबिंब दिसून येईल.
सणाच्या तयारीसाठी, खेळांसाठी किंवा फक्त मजेसाठी—हे उखाणे नक्कीच उपयुक्त ठरतील. नवीन, आकर्षक आणि अर्थपूर्ण मराठी उखाण्यांचा हा खास संग्रह तुम्हाला आवडेल अशी आम्हाला खात्री आहे.
