रोज रोज दिवस नवा व अनुभवही नवा
…… ना अन् मला येणारया बाळराजांकरिता तुमचा आशीर्वाद हवा.
चांदीच्या वाटीत रुपये ठेवले साठ, …..चे नाव घेते केला डोहाळ जेवणाचा थाट
मावळला सूर्य, उगवला शशी, …..चे नाव घेते डोहाळ जेवणाच्या दिवशी
सासूबाई आहेत प्रेमळ, वन्सबाई आहेत हौशी, ……चे नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी
बाळराजांची चाहुल दरवळला परिसर, ….. च्या सहवासात माझे जीवन होईल सफल
संसारातल्या राजकुमाराची स्तुती स्तोत्रे गायला लागत नाही भाट
….. राव पाहतात आता बोबड्या बोलाची वाट
