Dasara Marathi SMS Messages

आज नवमी आणि उद्या दसरा, आता आपले दुःख सारे विसरा
विचार करू नका काही दुसरा, नेहमी चेहरा ठेवा हसरा
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा


दारी झेंडूची फुले हाती आपट्याची पाने
या वर्षाच्या लुटूयात सद्विचारांचे सोने!
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा


आपट्याची पाने झेंडुची फुले घेऊन आली विजयादशमी
दस-याच्या या शुभ दिनी सुख-सम्रुद्धी नांदो आपल्या जीवनी


रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी, सजली दारी तोरणे ही साजिरी
उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा, उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!


सोनेरी दिवस, सोनेरी पर्व,
सोनेरी क्षण, सोनेरी आठवणी,
सोनेरी शुभेच्छा फक्त सोन्यासारख्या लोकांना


वाईटावर चांगल्याची मात, महत्व या दिनाचे खास असे
जळोनिया रावणाचा द्वेष अन मत्सर, मनोमनी प्रेमच प्रेम वसे


मराठी अस्मितेची मराठी शान, मराठी परंपरेचा मराठी मन
आज सोन्यासारखा दिवस घेऊन येईल सुख, समृद्धी अन धन
दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा


आपट्याची पाने फुलांचा वास आजचा दिवस आहे खूपच खास
तुम्हाला सर्व सुख लाभो या जगात हीच प्रार्थना या दसऱ्यात
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा


Happy Dasara Wallpaper Marathi


हिंदू संस्कृती आपली, हिंदुत्व आपली शान
सोने लुटुनी साजरा करू सण आणि वाढवू महाराष्ट्राची शान
शुभ दसरा (Shubh Dasara)


झेंडूचे तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येऊदे घरी
पूर्ण होऊदे तुमच्या सर्व इच्छा. विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा


आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे,
दुःखा नंतर येईल सुख पडतील सुलटे फासे
रडणे हरणे विसरून जा तु आणि प्रत्येक क्षण कर तु हसरा
रोज रोजचा दिवस फुलेल होईल सुंदर दसरा


उत्सव आला विजयाचा दिवस सोनं लुटण्याचा
नवं जुनं विसरून सारे फक्त आनंद वाटण्याचा
तोरणं बांधू दारी घालू रांगोळी अंगणी
करू उधळण सोन्याची जपू नाती मना मनांची
दसऱ्याच्या लाख लाख शुभेच्छा


पहाट झाली दिवस उजाडला आला आला सण दसऱ्याचा आला
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं, उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं
शुभ दशहरा


सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा, केवळ सोन्यासारख्या लोकांना


दसऱ्याला म्हणे सोन वाटतात, एवढा मी श्रीमंत नाही
पण नशीबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच, सदैव असेच राहा…
Happy Dasara


दारावर तोरण आणि अंगणात रांगोळी
देवघरातील पाटावर सरस्वती विराजली
सोने लुटुनी साजरा करुया दसरा
असो तुमचा चेहरा सदैव हसरा


झेंडूची फुले केसरी केसरी, वळणावळणाचं तोरण दारी
गेरूचा रंग करडा तपकिरी, आनंदे अंगणी रांगोळी नाचरी
कृतकृत्याचा कलश रुपेरी, विजयादशमीची रीत ही न्यारी


दिन आला सोनियाचा भासे धारा ही सोनेरी
फुले जीवन आपुले येवो सोन्याची झळाळी
दसऱ्याच्या गोड शुभेच्छा


झेंडूची फुले दारावर डुले, शेतात डोले आपट्याची पाने
तांबडं फुटलं उगवला दिन, सोन्यानी सजला दसऱ्याचा दिन
दसऱ्याच्या गोड शुभेच्छा


नसे भय पराजयाचे विजयाचे आम्हा वेड
लुटुनी सोने आनंदाचे रोविती प्रेमाची मुहूर्तमेढ
शुभ दसरा


Wonderful Happy Dussehra Messages in Marathi!

The festival of Vijayadashmi or Dussehra is celebrated as Navratri ends. Dussehra is a wonderful festival and a great opportunity to kill your inner Ravana, I.e. your inner demons.

Dussehra is a festival known for the prevail of good over bad, the moment when you get over all your inner demons and negativity, be it ego, greed or selfishness. It is also when people, especially your near and dear ones message you ‘Happy Dussehra’ and inspire you to evacuate all your negativity and stride on the path of positiveness.

Well, with Marathi Planet, you can SMS all your relatives and friends with those perfect Happy Dussehra messages in Marathi! Yes, we have tons of goodwill messages about Dussehra and some messages even explain the whole scenario of why we celebrate Dussehra.

Send these Dussehra SMS’s to your loved ones in Marathi, your native language and spread a smile on their faces. Our Marathi messages on Vijayadashmi or Dussehra are all about having courage, righteousness, success and triumph over evil. So encourage all your pals this Vijayadashmi to conquer vijay over their demons and hail victorious!

Shubh Vijayadashmi coming from Marathi Planet! And here are your favorite messages in Marathi!

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *