Utha Utha Chiutai

उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले अजूनही अजूनही

सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी
डोळ्यांवर झोप कशी अजूनही अजूनही

लगबग पाखरे ही गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे चोहीकडे चोहीकडे

झोपलेल्या अशा तुम्ही आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी चिमुकल्या चिमुकल्या

बाळाचे मी घेता नाव जागी झाली चिऊताई
उठोनिया दूर जाई भूर भूर भूर भूर


View all Marathi Balgeet Lyrics

Liked it? Share with your friends...

3 thoughts on “Utha Utha Chiutai

  1. खूप खूप आभार!! माझी आई माझ्या मुलीला ह्या कवितेची पहिली दोन कडवी म्हणून दाखवते!!! पुढची कडवी तीला आठवत नव्हती!!

  2. Khup chhan aahe hi Kavita.. Mi lhanpani jenwa Skali ushira prynt zopt aase tenwa maze Pappa mla hi Kavita gaun dakhwt aast.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *