Tuza Dharma Konta

मंदिरावर पडतो
मशिदिवरही पडतो
सांग रे पावसा, तुझा धर्म कोणता?

कोजागिरी ही तुझी
ईद ही तुझीच
सांग रे चांदोमामा, तुझा धर्म कोणता?

दंगलीत हे ही भिरकवतात
ते ही भिरकवतात
दगडाच्या देवा, तुझा धर्म कोणता?

मुस्लिम तुझ्यावर कब्र बनवतो
हिंदू शेवटी तुझ्यातच विलीन होतो
सांग गं माती, तुझा धर्म कोणता?

कोणा भगवा प्रिय कोणा हिरवा
अन्नासाठी व्याकुळ त्या अनाथाकडे बघून
भुकेपेक्षा मोठा धर्म कोणता,

कवी : UNKNOWN


View All Marathi New Poems

Liked it? Share with your friends...