Tuch Hoshil Dev

तू राम म्हण, अल्ला म्हण, येशू म्हण, साई म्हण
देव म्हण, दूत म्हण, अवतार म्हण, काही म्हण
मी हरकत घेण्याचं कारण काही नाही
पण माणूस म्हणून एक गोष्ट खरंच पटत नाही

तू हवी त्याची पूजा कर, हवी त्याची आरती गा
मॅगी, पिझ्झा, चिकन, मटण, प्रसाद म्हणून काही खा
चोवीस तास देव देव कर, वाटल्यास विसर घर
पण चांगला माणूस म्हणून फक्त एवढा विचार कर

देव म्हणजे सुपर पॉवर, ब्रह्माण्डावर ताबा
मग त्याचं ऑफिस गल्ली बोळात कशाला रे बाबा?
ऐकलं होत देव असतो उभा सत्यपाठीं
तरी त्याच्या अवती भवती दलालांची दाटी?

चोर, डाकू, बलात्कारी, सारेच त्याचे भक्त
देव काय नुसते चेहरे बघत बसतो फक्त?
असा कसा चिडत नाही, त्याला नाही भान?
वरून तुझ्यासारखे मूर्ख तिथंच देतात दान

देवळा भवती भिकारी, लुळे, पांगळे जीव
ज्याला असेल काळीज त्याला पाहून येते कीव
प्रश्न त्यांचे सुटत नाहीत, दुःख सरत नाही
तरी तुझा सुपर देव काहीच करत नाही

म्हणून म्हणतो डोकं वापर, गहाण नको ठेऊ
भुकेल्याला, तहानल्याला घाल कधी जेवू
अनाथ, कोवळ्या हातामध्ये पाटी पुस्तक ठेव
आई शप्पत तुला सांगते तूच होशील देव

कवी : UNKNOWN


View All Marathi Short Poems

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *