Sang Na Bhetayla Kontya Pattyavar Yeu

माणसांच्या गर्दीत हरवून बसला माझा भाऊ
सांगा ना त्याला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ

एकुलता एक दादा त्याला जीवापाड जपला
लग्न झाल्यापासून वाहिनीच्या पदराआड लपला
एक दिवस तरी नको वहिनीला भिऊ
सांग ना रे भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ

नको दादा साडी मला नको पैसा पाणी
तुझ्या सुखासाठीच देवाला करते विनवणी
सांग तुला कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ
सांग ना रे भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ

काम गेलं तुझ्या दाजींचं म्हणून दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते
तळ हातावरचे फोड बघून तुझी आठवण येते
दादा चढउतार होतात जीवनात तू घाबरून नको जाऊ
सांग ना तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ

उचलत नाहीस फोन म्हणून वहिनीला केला
रॉन्ग नंबर करत कट त्यांनी केला
नसेल ओळखला आवाज म्हणून त्रास नको देऊ
दादा सांग ना रे भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ

आई बाबा सोडून गेले घर पोरकं झालं
आठवणींचे आभाळ डोळ्यांमधी आले
वाईट वाटते शेजारी येतात जेव्हा त्यांचे भाऊ
सांग ना तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ

नको मला जमीन नको घराची वाटणी
आवडीने खाईन भाकरी आणि चटणी
काकुळतीला आला जीव मनात राग नको ठेऊ
दादा सांग ना रे भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ

कवी : UNKNOWN


View All Poem on Sister in Marathi

Liked it? Share with your friends...

One thought on “Sang Na Bhetayla Kontya Pattyavar Yeu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *