Puneri Jokes in Marathi

वर्गणीवाले….. काका, स्मशानभूमीच्या कुंपणाकरीता वर्गणी द्या…….

Punekar काका: कशाला हा उपद्व्याप…..काहीही कुंपण नको….आत गेलेला काही बाहेर येत नाही……
आणि बाहेरच्याला आत जायची इच्छा नाही…..


एका लग्नाच्या रिसेप्शनला गेलो होतो… तेथे आइसक्रीम कप देतांना कपाळाला गंध लावायचे.. मी विचारले ही काय नविन प्रथा आहे कां????

ते म्हणाले नाही.. प्रथा बिता काही नाही..लोक येवून १०- १० आइसक्रीम कप उचलतांत म्हणून ही आईडीया….

स्थळ :- Pune


स्थळ : पुणे

मुलगा – मला काटकसर करणारी मुलगी हवी आहे

मुलगी – मी बोरबोन बिस्किटाच्या वरची साखर चहाला वापरते…


पुण्यामध्ये सध्या एकच शोधाशोध.
मागच्या वर्षी धुवून ठेवलेला मोती साबण कुठे आहे.

 


मराठी पुणेरी विनोद


 

विजय मालयाला लंडन मध्ये अटक झाल्याचा मोबाईल वर मेसेज आला, तेव्हा मी हिंजेवाड़ीच्या सिग्नलला होतो.
त्याला जामिनावर सोडून तो त्याच्या घरी पोहोचला तरी मी हिंजेवाड़ीच्या सिग्नललाच होतो.


सदाशिव पेठ (Pune)-
“हियरिंग एड चे यंत्र केवढ्याला?”
“वीस रुपयापासून पाच हजार पर्यंत.”
“वीस रुपयांचे बघू.”
“हे घ्या. कानात एक बटण आणि कानातून शर्टाच्या खिशात एक वायरचा तुकडा सोडायचा”
“हे कसं काम करतं?”
“वीस रुपयाचं यंत्र काय काम करणार? पण ते बघून सगळे जण तुमच्याशी मोठ्यानी बोलायला लागतात.”


सदाशिव पेठेत हेलावून टाकणारा प्रसंग, “गुरुजी, मला ओळखलं काय?”
गुरुजी : होय १९८७ ची १० वी ची बॅच ना तुझी??
मुलगा : हो गुरुजी
गुरुजी : आरे तुझी ३ महिन्याची ट्युशन फी बाकी आहे रे आजून


रेल्वेमध्ये आई आणि मुलगा प्रवास करत असतात. आई म्हणते, “बाळा कोणते स्टेशन आलं रे?”
मुलगा खिडकीतून बाहेर बघतो. प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या माणसाला विचारतो, “काका कोणतं स्टेशन आहे हे?”
तो माणूस म्हणतो, “देवाने जे दोन डोळे दिलेत ना, त्याचा वापर करा… गाडी फलाटावर येताना काय झोपा काढत होता का? मोठी काळी पिवळी पट्टी दिसली नाही का स्टेशनची येताना? तुम्ही हल्लीची पोर… कष्ट करायला नको… सगळं आयत पाहिजे…”
मुलगा म्हणतो, “आई, Pune आलं!”

 


Puneri Patya Jokes


 

माझी गाडी एकदा भर पावसात म्हात्रे पुलाजवळ बंद पडली… मी खाली उतरून काय झालं ते बघत होतो, कारण सापडत नव्हतं. मागचा गाडीवाला सतत हॉर्न वाजवीत होता, किंबहुना तो हॉर्नवरचा हात काढतच नव्हता. मी शांतपणे त्याच्याजवळ गेलो व भिजत भिजतच म्हणालो, “तुम्ही बघता का माझ्या गाडीला काय झालंय ते? तेवढा वेळ मी तुमच्या गाडीचा हॉर्न वाजवीत बसतो.
त्या दिवशी मला पुण्याचे नागरिकत्व मिळाले


चावी विसरल्याने मी बायकोबरोबर बाहेर मुलांची वाट पहात बराच वेळ उभा होतो. शेजारच्या घरातून मस्त चहाचा सुगंध आला.
मी बायकोला म्हणालो : तुझे गुढघे दुखत असतील नाही?
तेवढ्यात शेजारच्या घराला आतून काडी लावल्याचा आवाज आला…
स्थळ : अर्थातच Pune


तरी नशिब चांगलं … पाकिस्तानला लागून पुणे नाही
नाहीतर रोज भांडण आणि रोज नवीन पुणेरी पाटी
“कृपया १ ते ४ बॉम्ब फोडू नये नाहीतर भयंकर अपमान केला जाईल”


Puneri पणा म्हणजे काय हे शिकण्यासाठी एक माणूस पुण्याला गोखले यांच्याकडे आला.
गोखले दारातच उभे होते. त्यांच्यातील संवाद :
-तुम्ही हा जो पायजमा घातला आहे तो किती दिवस वापरणार ?
-एक वर्ष
-त्यानंतर फेकून देणार?
-नाही, त्यानंतर आमची सौ त्याच्या हाफ चड्ड्या बनविते.
-त्या तो किती दिवस वापरतो?
-अंदाजे एक वर्ष.
-मग?
-त्यानन्तर त्याची आम्ही पिलो कव्हर बनवितो. ती साधारण सहा महीने वापरता येतात.
-मग?
-मग त्या फाटलेल्या कव्हरचा उपयोग मी सायकल पुसायला करतो.
-मग ते तुकडे टाकून देता?
-नाही, त्यानंतर सायकलची चेन किंवा अन्य तेलकट भाग पुसायला आम्ही ते तुकडे वापरतो, अंदाजे सहा महीने पुरतात.
-त्यानंतर तरी ते मळकट तुकडे तुम्ही टाकून देता की नाही?
-नाही, त्याचा आम्ही काकडा करतो आणि चूल पेटवण्यासाठी वापरतो.
-म्हणजे त्याची राख होईपर्यंत तुम्ही ह्या पायजम्याची साथ सोडत नाही?
-ती राखही आम्ही भांडी घासायला वापरतो.
त्या माणसाने गोखल्यांच्या चरणांना स्पर्श केला.


Puneri Jokes


पुण्यात नाटकाचा पहिला प्रयोग संपतो.
लेखक : कसे वाटले? नाटकात काही बदल आवश्यक आहेत ?
जोशी काका : नाटकाच्या शेवटी नायिका विष घेऊन मरते त्या ऐवजी बंदुकीने गोळी झाडून घेते असे दाखवा.
लेखक : का?
जोशी काका : म्हणजे बंदुकीच्या आवाजाने प्रेक्षक जागे होतील आणि घरी जातील.


Puneri गिऱ्हाईक : मारुती चे Spare Parts आहेत काय?
Puneri दुकानदार : डोळे फुटले आहेत की वाचता येत नाही? बाहेर इतका मोठा बोर्ड टांगलाय आम्ही फक्त मारुतीचेच Spare Parts विकतो.
Puneri गिऱ्हाईक : ठीक आहे, एक गदा द्या


लेटेस्ट Puneri किस्सा
जोशी : मी इथले टॉयलेट वापरू का?
नेने : हो, पण पैसे पडतील
जोशी : नाही पडणार, बसताना काळजी घेईन मी


पुण्याच्या टिळक रस्त्यावरून, बाईक वरून जात होतो. एक स्त्री पुढे स्कूटरवर होती. अचानक ती उजवीकडे जाणाऱ्या रस्त्याला वळली (अर्थात इंडिकेटर किंवा हात न दाखवता).
मी तिला धडकलो. तिला म्हणालो, “अहो कमीतकमी हात तरी दाखवा वळताना”
तर ती म्हणाली, “त्यात काय हात दाखवायचा?, मी रोजच इकडे वळते”


Punekar : आहो, अजून बिस्किटे घ्या ना
पाहुणा : नको हो, आधीच मी ५ खाल्ली आहेत
Punekar : तशी तुम्ही ६ खाल्ली आहेत, पण आजून खा की, ईथे कोण मोजत बसलंय??

 


Puneri Jokes in Marathi Font


 

मुलगा : चाहूंगा मॆ तुझे सांज सवरे
मुलगी : आणि दुपारचे काय?
मुलगा : १ ते ४ विश्रांती. मी पुण्याचा आहे


पुण्यातल्या एका फ्री वायफाय नेटवर्कचा पासवर्ड, “घे भिकारड्या”


भिकारी : साहेब खूप भूक लागली आहे. ५ रुपये द्या ना
Punekar : १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?
भिकारी : हा आहे साहेब
Punekar : आधी ते खर्च कर


पुण्यातील एक खवचट म्हातारा एकदा दातांच्या डॉक्टरांकडे गेला. त्या खुर्चीत बसल्यावर डॉक्टरांनी त्यांना मोठा आ आ आ करायला सांगितले. कितीही मोठा केला तरी ते आजून मोठा करायला सांगायचे.
म्हातारा म्हणाला, “तोंडात बसून काढणार असाल तर ती पायातली चप्पल आधी काढा”


जोशी काकू : बघा, मंडईतून भाजी आणण्यापासून ओलिंपिक मेडल पर्यन्त सगळं बायकांनाच आणावं लागतंय
जोशी काका : आम्ही पुरुष मेडल बीड्ल्सच्या भानगडीत पडत नाहीत कारण कोणतंही मेडल आणले तरी बायको नाक मुरडणारच आणि ते बदलून आणायला पाठवणार…. अगदी गोल्ड मेडल जरी आणले तरी बायकोला डिझाईन पसंत पडेलच याची काय गॅरंटी?

 


Marathi Puneri Jokes


 

आमच्या पुण्यातल्या लोकांना सगळं कसं जवळ हवं असतं
पश्चिमेकडे प्रति शिर्डी तयार करून ठेवलीय आणि
दक्षिणेकडे प्रति बालाजी
आता फक्त खडकवासल्यात प्रति अरबी समुद्र तयार करायचा बाकी आहे
मग सगळं कसं जवळ जवळ


स्वारगेट वर मुंबईची मुलगी आपल्या कॉलेज स्टाईल मध्ये तुच्छतेने कंन्डक्टरला विचारते : हे डबडं केव्हा हलणार इथून?
कंन्डक्टर (अदबीने, सस्मित) : कचरा भरल्यानंतर लगेचच !
तात्पर्य : महामंडळाच्या कंन्डक्टरचा नाद करू नये


Punekar : काका पावशेर रताळे द्या
दुकानदार : पिशवीत देऊ?
Punekar : नाही नाही… पेन ड्राईव्ह आणलाय. त्यात “रताळे” नावाचा फोल्डर बनवा आणि टाका त्यात


पुण्यात एकदा एका कॅन्टीन मध्ये दोन मुली स्कार्फ बांधून गप्पा मारत होत्या.
जवळजवळ अर्धा तास गप्पा मारत होत्या.
काही वेळाने दोघींनी स्कार्फ काढला आणि अचानक ओरडल्या, “अय्या तू कोण???”


पुण्यातील एक नामवंत डॉक्टर : तुमच्या आजाराचं नेमकं कारण माझ्या लक्षात येत नाहीये. कदाचित दारू प्यायल्यामुळे हे होत असावं…
Punekar पेशंट : हरकत नाही… तुमची उतरल्यानंतर येतो मी परत

 


Puneri Jokes Marathi Language


 

Punekar : काय हो गहू कसा आणला?
कोल्हापूरकर : पिशवीतून आणला
Punekar : कितीला आणला?
कोल्हापूरकर : दुपारी दीड वाजता आणला.
Punekar : तसं नाही हो. कोणत्या भावाने आणला?
कोल्हापूरकर : चुलत भावाने


तुम्हाला माहीत आहे का, सदाशिव पेठेत एकही जिम नाही. याचे कारण काय?
जिमला जाणे म्हणजे घरचं खायचं आणि लोकांचं लोखंड उचलायचं आणि वर त्यांनाच पैसे द्यायचे…
छे छे असा वेडेपणा कोण करणार?


एकाने विचारले तुझे शाळेतले मित्र काय करतात आता ?
मी सांगितले : काही पुण्यात गेले, काही पिण्यात गेले
अन बाकीचे उरलेले गायछाप चुन्यात गेले


काय करावं हेच कळत नाय – मंगळसूत्र घातलं की चोरांच्या नजरा
अन नाय घातलं तर पोरांच्या नजरा
– एक पुणेकर महिला


पुणेकर : उंदीर मारायचे औषध द्या
दुकानदार : घरी न्यायचंय का ?
Punekar : नाही … उंदीर सोबत आणलाय इथंच खाऊ घालतो


पुण्यात एक नवरा त्याच्या गरोदर बायकोला हॉस्पिटल मध्ये घेऊन जात होता
एक माणूस : तुमच्या मिसेस काय ?
Punekar : हो
माणूस : प्रेग्नेंट आहेत काय ?
Punekar : (रागाने) नाही, फुटबॉल गिळलाय तिने…. व्हा बाजूला

 


Puneri Jokes for Facebook


 

पुण्याला गेलो, एक विदेशी स्त्री भेटली आणि म्हणाली : व्हेअर इज खत्रूड ??
मी म्हणालो : हिअर इन पुणे एवरीबडी इज खत्रूड
ती म्हणाली : आय डोन्ट अंडरस्टैण्ड
तिने कागद दाखवला त्यावर लिहिले होते “KOTHRUD”


मुंबईकर : पुण्यात मुंबईसारखे पूर्व किंवा पश्चिम अशा पाट्या का नसतात ?
Punekar : त्याची काय गरज आहे? आम्हाला दिशा कळतात … शिवाय आम्ही म्हणू ती पूर्व दिशा असते


पुणेरी विवाह मंडळातील सूचना : आपल्या उपवर कन्येचा विवाह लवकर व्हावा अशी आपणास इच्छा असल्यास, कन्येचे ओठांचे चंबू केलेले, जीभ बाहेर काढलेले, केसांची भुसारी कॉलनी झालेले सेल्फी नामक फोटो देऊ नये. इच्छुक सासू सासरे बिथरतात …


पुणेरी लाडूची रेसीपी :
लाडू करताना लाडूला काजू फक्त टोचावा आणि पुन्हा काढावा.
खाणाऱ्याला वाटेल कि नेमका आपल्याच लाडूचा काजू गळून पडला असेल.
अशा प्रकारे एक काजू सर्व लाडूंना पुरून उरतो.


एक आजोबा कोथरूडला रिक्ष्यात बसतात. शिवाजी पुतळ्याला रिक्षा थांबवतात.
आजोबा : किती झाले?
रिक्षावाला : ३२ रुपये
आजोबा ४० रुपये देतात
रिक्षावाला : सुट्टे नाहीयेत
आजोबा : ठीक आहे. जोपर्यंत मीटर मध्ये ४० होत नाहीत तोपर्यंत पुतळ्याभोवती गोल गोल फिरव
रिक्षावाला मुकाट्याने सुट्टे पैसे देतो

 


Puneri Jokes for WhatsApp


 

Puneri माणूस : केळी कशी दिली राव?
दुकानदार : एक रुपयाला एक
Puneri माणूस : काय तरी काय. साठ पैशाला देता का बोला
दुकानदार : अहो साठ पैशात तर त्याचं साल फक्त येईल
Puneri माणूस : ठीक आहे. मग हे चाळीस पैसे घ्या आणि मला सालीशिवायचं केळं द्या


एक बाळ जन्माला आल्या-आल्या बोलायला लागतो, तो नर्सला विचारतो, खायला काय आहे?
नर्स : पोहे आणि उपीट तयार आहे
मुलगा: अरे वा, परत पुण्यात जन्माला आलो


एक Puneri मुलगा आपल्या मित्रांना घरी घेऊन आला आणि म्हणाला, ” थांबा मी चहा घेऊन आलो”.
१० मिनीटांनी, ” चला माझा चहा घेऊन झाला आपण आता जाऊया!”


पेशंट : डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर : ३ लाख रुपये.
पेशंट : (थोडा विचार करून) आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर..??


एका पुण्यातल्या रिक्षावाल्याला पोलिस आडवतात
पोलिस : रिक्षा gas वर आहे?
रिक्षावाला : नाही
पोलिस : मग डीझेल वर आहे?
रिक्षावाला : नाही
पोलिस : बारा मग पेट्रोल वर आहे का?
रिक्षावाला : नाही
पोलिस : आरे मग कशावर आहे?
रिक्षावाला : हफ्त्यावर

 


Latest Puneri Jokes in Marathi


 

कोलगेट : काय आपल्या टूथ पेस्ट मध्ये मीठ आहे ?
पुणेकर : नाही, आम्ही वरून टाकून घेतो चवीनुसार
कोलगेट वाल्याने स्वत:च्या थोबाडीत मारून घेतल्या


पुणेरी कुलकर्णी ची कार बिघडली म्हणून ते पायी पायी कामासाठी जात होते
तेवढ्यात त्यांना जोशी भेटले आणि त्यांनी खवचटपणे विचारले,
काय कुलकर्णी आज पायी पायी ? कार विकली काय ?
कुलकर्णी म्हणाले, अरे आज तुम्ही पण एकटेच, वहीनी दिसत नाहीत बरोबर ?
कुणाबरोबर पळून गेल्या की काय ?
पुणेकराच्या वाटेला न जाणेच बरे


मोटार सायकलवाला : एक्सक्यूज मी, मला सदाशिव पेठेत पेरूगेटला जायचंय
पुणेकर : मग जा की … असं प्रत्येकाला सांगत सांगत जात बसला तर कधी पोहोचणार ??


मासेवाला : साहेब खेकडे घ्या एकदम ताजे आहेत
पुणेरी ग्राहक : द्या मग १०० रुपयाचे
मासेवाला : कशात नेता?? पिशवी देऊ का ??
पुणेरी ग्राहक (रागाने) : नाही काठी दे, हाकत हाकत नेतो घरापर्यंत

 


Puneri Jokes for WhatsApp


 

स्थळ : अर्थातच पुणे…
कंडक्टर : सुट्टे पैसे नसणाऱ्यांनी खाली उतरा
कुलकर्णी १०० रुपये कंडक्टरला देऊन म्हणतात, “डेक्कन पर्यंत एक फुल द्या”
कंडक्टर : (वैतागून) आहो तिकीट ६ रुपये आहे. तुम्हाला परत द्यायला माझ्याकडे ९४ रुपये सुटते नाहीत.
कुलकर्णी : मग खाली उतरा

 


मराठी पुणेरी विनोद


Pune is one of the beautiful city in the state of Maharashtra. It is a realistic picture of the Marathi culture. Pune, also called as Poona is the second largest city of Maharashtra after Mumbai. People staying in Pune known as Punekar and are famous for their different attitude. People here speaks fluent Marathi language. With unique Marathi culture and people you can also notice some funny thing about pune and people living here. Such funny things sometimes create jokes. We have listed such puneri jokes for our readers and thats too in the Marathi language.


Funny Puneri Patya


Liked it? Share with your friends...

2 thoughts on “Puneri Jokes in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *