Pratyekala Ek Bahin Asavi

प्रत्येकाला एक बहीण असावी
लहान मोठी शांत खोडकर कशीही असावी

मोठी असेल तर आई बाबांपासून वाचवणारी
लहान असेल तर आपल्या पाठीमागे लपणारी

मोठी असल्यास गुपचूप आपल्या पॉकेट मध्ये पैसे ठेवणारी
लहान असल्यास चुपचाप काढून घेणारी

लहान असो वा मोठी छोट्या छोट्या गोष्टींसाठी भांडणारी
एक बहीण प्रत्येकाला असावी

मोठी असल्यास आपलं चुकल्यावर कान ओढणारी
लहान असल्यास तिचं चुकल्यावर “सॉरी दादा” म्हणणारी

लहान असो वा मोठी आपल्याला एक बहीण असावी
आपल्या एखाद्या मैत्रिणीला वाहिनी म्हणून हाक मारणारी

मोठी असल्यास प्रत्येक महिन्याला नवा शर्ट आणणारी
लहान असल्यास प्रत्येक पगारात आपल्या खिशाला चंदन लावणारी

ओवाळणी काय टाकायची हे स्वतः ठरवत असली तरीही
तितक्याच ओढीने राखी पसंत करून आणणारी

एक बहीण प्रत्येकाला असावी
कठीण प्रसंगी खंबीर राहील, स्वतःपेक्षाही जास्त आपल्यावर प्रेम करणारी

कवी : UNKNOWN


View All Marathi Poem on Sister

Liked it? Share with your friends...

4 thoughts on “Pratyekala Ek Bahin Asavi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *