Paithani Kavita Shanta Shelke

फडतालात एक गाठोडे आहे; त्याच्या तलाशी अगदी खाली
जीथे आहेत जुने कपडे, कुंच्या, टोपडी शेले शाली

त्यातच आहे घडी करुन जपून ठेवलेली एक पैठणी
नारली पदर, जरी चोकडी, रंग तीचा सुंदर धानी

माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती
पडली होती सार्यांच्या पाया हाच पदर धरुन हाती

पैठ्‍नीच्या अवती भवती दरवळणारा सूक्ष्म वास,
ओळखीची… अनोळखीची… जाणीव ग़ूढ आहे त्यास

धुप… कापूर… उद्बत्यातून जळत गेले कीती श्रावण
पैठनीने या जपले एक तन एक मन…

खस-हीन्यात माखली बोटे पैठनीला केंव्हा पुसली
शेवंतीची,चमेलीची आरास पदरा आडुन हसली

वर्षामागून वर्षे गेली,संसाराचा स्राव झाला,
नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला

पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले
अहेवपणी मरण आले,माझ्या आजीचे सोने झाले

कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवटाळून
मऊ-रेशमी स्पर्शामधे आजी भेटते मला जवळून

मधली वर्षे गळून पडतात, काळपटाचा जुळतो धागा
पैठ्नीच्या चोक्ध्यानो आजीला माझे कुशल सांगा…

कवी : शांत शेळके


View All Old Marathi Kavita

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *