सूचना – जर आपण सहकुटुंब कुठे फिरायला गेलात तर आपले तिथले फोटो फेसबुक किंवा व्हाट्सप वर टाकू नये सूचना – जर आपण सहकुटुंब कुठे फिरायला गेलात तर आपले तिथले फोटो फेसबुक किंवा व्हाट्सप वर टाकू नये त्यामुळे जे कधी कुठे जात नाही त्यांच्या घरी भांडणं होतात
बापू : दारु पेल्यावर खोकला जातो का रं तात्या?
तात्या : अरे बापू दारुमुळे माझं शेत गेलं, घरदार गेलं, बायको गेली, तर मग तुझा खोकला का जाणार नाही… पी तू
मुलगी : आई पाहुणे आलेत पण सरबत करायला लिंबू नाही
आई : काळजी करू नको बाळ, नवीन Vim Bar मध्ये शंभर लिंबांची शक्ति आहे, टाक दोन तुकडे
गोट्या आजीला झोपताना : आपण घरात नेहमी ५ जण राहणार, तू, बाबा, आई, मी आणि दीदी
आजी : नाही रे, तुझे लग्न झाले की ६ होणार
गोट्या : दीदीचे लग्न झाले की परत ५ होणार
आजी : आणि तुला मुलगा झाला की परत ६ होणार
गोट्या : तू मेल्यावर परत ५ होणार
आजी : झोप मेल्या…
लग्नाआधी – दिल दोस्ती दुनियादारी
लग्न ठरवताना – होणार सून मी या घरची
लग्न जमल्यावर – जुळून येती रेशीमगाठी
लग्न झाल्यावर – नांदा सौख्यभरे
लग्नाच्या १ महिन्यानंतर – होम मिनिस्टर
लग्नाच्या २ महिन्यानंतर – तू तिथे मी
लग्नाच्या २ वर्षानंतर – डिटेक्टिव्ह अस्मिता
लग्नाच्या ५ वर्षानंतर – माझीया प्रियाला प्रित कळेना
लग्नाच्या १० वर्षानंतर – का रे दुरावा
लग्नाच्या २० वर्षानंतर – एका लग्नाची दुसरी गोष्ट
लग्नाच्या ४० वर्षानंतर – चला हवा येऊ द्या
लग्नाच्या ५० वर्षानंतर – झी गौरव पुरस्कार
एक मुलगा १५ मिनिटातच पेपर देऊन बाहेर जात होता
मॅडम : काय झालं तुला, पेपर अवघड वाटतोय काय?
मुलगा : ज्याच्या भरोशावर आलो तोच मला उत्तर दाखव म्हणतोय
मॅडम जागेवर कोसळून पडल्या
एका ऑटोवाल्याचं लग्न चालू असतं. मुलीला बोलावले जाते. मुलगी येते आणि जेव्हा त्याच्या बाजूला बसते तेव्हा ऑटोवाला म्हणतो, “थोडं जवळ सरकून बसा, अजून एक बसू शकते”
एक नवरा त्याच्या गरोदर बायकोला Hospital मध्ये घेऊन जात होता
एक माणूस : तुमच्या मिसेस का?
नवरा : हो
माणूस : Pregnant आहेत काय?
नवरा : (रागाने) नाही Football गिळलाय तीने, व्हा बाजूला
प्रवाहाबरोबर सगळेच जातात पण प्रवाहाविरुद्ध जो जातो तोच यशस्वी होतो.
हेच मी ट्रॅफिक पोलिसाला सांगितले पण त्याने पावतीच फाडली
इकडे आजकालची शाळेतील मुले शाळा सुटल्यावर मुलींसोबत पार्ट्या करतात
आणि एक आम्ही… घंटा वाजली रे वाजली नुसतं पळत सुटायचो, कुठे पळतोय ते पण कळायचं नाय
म्हणून म्हणतो मराठीत टाईप करा…
एका मैत्रिणीची बायपास झाली. तिला दुसऱ्या मैत्रिणीने मेसेज केला “Aata tula udya marayla hi harkat nahi”
बायपास झालेल्या मैत्रिणीला चक्कर येणं बाकी होतं कारण तिने वाचलं “आता तुला उद्या मारायला हरकत नाही”
पण मूळ मेसेज होता “आता तुला उड्या मारायला हरकत नाही”
गर्लफ्रेंड बरोबर फोन वर
बॉयफ्रेंड : माय कॉम्पुटर वर राईट क्लिक कर
गर्लफ्रेंड : केलं
बॉयफ्रेंड : आता प्रॉपर्टीस वर क्लिक कर
गर्लफ्रेंड : केलं
बॉयफ्रेंड : डिवाइस मॅनेजर उघड
गर्लफ्रेंड : उघडलं
बॉयफ्रेंड : आता वर काय आहे सांग?
गर्लफ्रेंड : पंखा
बॉयफ्रेंड : ठेव फोन… येतो मी लगेच
गावाकडे लोक मुंबईत एका लग्नाला गेले
आत गेल्यावर इतके सारे सलाडचे प्रकार बघून लगेच बाहेर आले
बाहेर येऊन पाटील म्हणतात “टाइम हाय, आजून भाजीच चिरत्यात”
मुलगी : आरे कालच तुला माझी छेड काढतोस म्हणून पोलिसांकडून मार दिला होता ना, आज परत आलास तू?
मुलगा : एकदा फेल झाल्यावर परीक्षेची तयारी करणे कोणी सोडून देते काय?
स्थळ : परीक्षा हॉल
मी : २ ऱ्या प्रश्नाचे उत्तर दाखव
मित्र : नाही लिहिलं
मी : ३ रा??
मित्र : नाही
मी : ४, ५, ६
मित्र : नाही, नाही, नाही
मी : तू पास तर हो, तुझा खून कसा झाला ते क्राईम पॅट्रोल मध्ये दाखवतील
एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं.
ती भडकली. त्याला धु धू धुतला. अगदी लोळवला.
कपडे झटकत तो उठला आणि म्हणाला, ” तर मग मी नाही समजू का?”
जंगलात आग लागलेली असताना एक चिमणी स्वतःच्या चोचीने पाणी वाहून आग विझवण्यासाठी धडपडत असते.
ते पाहून एक कावळा तिला सांगतो की “तू कितीही प्रयत्न केलेस तरी ही आग विझणार नाहीये”
त्यावर ती चिमणी सुंदर उत्तर देते…
“जा ना रे काळ्या… ”
एक तापलेला विद्यार्थी गणिताच्या मास्तरांना ….
जर शून्याचा शोध आर्य भट्टांनी लावला आणि आर्यभट्टांचा जन्म कलियुगात झाला
तर मग आधीच्या युगात १०० कौरव आणि रावणाची १० तोंडे कोणी मोजली होती ????
मास्तर राजीनामा देऊन पोथी – पुरण वाचत बसलेत
बायको रात्री २ वाजता उठून नवर्याला प्रश्न करते …
बायको : त्रिदेव मध्ये तीन हिरोइन कोणत्या होत्या?
नवरा : माधुरी , संगीता आणि सोनम
बायको : २००३ मध्ये वर्ल्डकप मध्ये पाकविरुद्ध सचिन ने किती रन्स केले?
नवरा : ९८
बायको : आपल्या बाजूची कविता आपल्या बिल्डींग मध्ये केव्हा राहायला आली?
नवरा : बुधवारी दोन महिने पूर्ण होतील … पण तू असे प्रश्न का विचारतेस?
बायको : काल माझा वाढदिवस होता !!!
Best Marathi Jokes
प्रेमी एकाच प्लेट मध्ये शेवपुरी खात होते. मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो,
मुलगी लाजून म्हणाली, “असा काय पाहतोयस रे?”
मुलगा : थोडं थोडं खा ना भिकारे