Navra To Navrach Asto

नवरा तो नवराच असतो
कितीही रागवला तरी मायेने तोच जवळ घेतो

कधी रागाने बाहेर गेला तरी त्याचे पाय आपोआप घराकडे वळतात
मनातले भाव त्याला डोळ्यातून कळतात

किती दु:खी असला तरी सारं गिळून घेतो
कोण आहे तिला आपल्या शिवाय म्हणून एक गजरा घेऊन येतो
नवरा तो नवराच असतो

काळजी का करतेस मी आहे ना तुला म्हणून किती धीर देतो
साऱ्या अडचणी आपल्या मनात ठेवून बायकोकडे हसऱ्या नजरेने पाहतो

जसं घरावर छत असतं तसंच आपल्या डोक्यावर नवऱ्याच झाकण असतं
किती सुरक्षित असतो आपण त्याच्या सावलीत
उन्हाचे चटके तो खातो पण सावली आपल्या डोक्यावर देतो
नवरा तो नवराच असतो

आपण चार अलंकार घालून म्हणतो मन माझी मंगळसूत्र तुझं
कपाळी माझ्या बिंदी तुझ्या नावाची
तो कधी म्हणतो का – कष्ट माझे पगार तुझा
शरीर माझं आयुष्य तुझं
जन्म आईच्या उदरात, पडलो तुझ्या पदरात
तू जीवन संगिनी म्हणून गोड मनत असतो
नवरा तो नवराच असतो

संसाराचा रथ दोन चाकांवर चालतो त्यासाठी दोघांनाही समतोल सांभाळावा लागतो
एक चक डगमगल तर एका चाकावर रथ हाकण फार अवघड होतं

बायको शिवाय घराला घरपण नाही तसच नवऱ्या शिवाय बायको पूर्ण नाही
तो कळस आहे घराचा, चत आहे परिवाराचा
चटके तो खातो आपण मात्र सावलीत राहतो
नवरा तो नवराच असतो

आयुष्यातल्या सगळ्या पोकळ्या भरता येतील
पण नवर्याची पोकळी कधीच भरून निघू शकणार नाही
म्हणून एकमेकांना मायेची हाक द्या
प्रेमाची साथ द्या जीवन क्षणभंगुर आहे जगण्याचा आनंद घ्या


View All Marathi Kavita on Husband

Liked it? Share with your friends...

4 thoughts on “Navra To Navrach Asto

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *