Navra-Baykocha Secret

नवरा बायकोचं सिक्रेट!!

विषय- तुझं सिक्रेट माझ्याकडे अगदी सुरक्षित आहे हं!

“नशीबवान आहेस तू सुनबाई, असा निर्व्यसनी नवरा मिळाला तुला, माझे संस्कारच होते तसे”! रमाबाई सुनेजवळ स्वतःच्या कौतुकाचे गोडवे गात होत्या.

राजेश ऐकून मनात खजील होत होता… खरंतर आता जरी व्यसनी नव्हता तो पण कॉलेजला मज्जा किंवा कुतूहल म्हणून सगळ्याच गोष्टी ट्राय केल्या आणि पुढे ते व्यसनात कसं बदललं त्याचं त्यालाच समजलं नाही आणि रेवतीला सगळं माहीत होतं पण रेवतीच्या प्रेमाने परत आणलं त्याला त्या विळख्यातून… वाल्याचा वाल्मिकी झाला म्हंटल तरी चालेल.

रेवतीने सासूबाईंना होकारा दिला, सासूबाईंचा गोड गैरसमज मोडवासा नाही वाटला तिला… राजेशला वचन दिलं होतं तसं तिने, तुझं सिक्रेट माझ्याकडे सुरक्षित ठेवेन पण त्या वाटेवर कधीच परत जायचं नाही… शेवटी एकमेकांचे सिक्रेट जपणे हाही नवर-बायकोच्या नात्याचा आधारच!

१००शब्दांचिगोष्ट

©®सुवर्णा राहुल बागुल

Liked it? Share with your friends...

You May Also Like

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *