मायेचं साजूक तूप, आईचं दुसरं रूप
काळजी रुपी धाक, प्रेमळ तिची हाक
कधी बचावाची ढाल, कधी मायेची उबदार शाल
ममतेचं रान ओलेचिंब पाण्यातील आपलंच प्रतिबिंब
दु:खाच्या डोहावरील आधाराचा सेतू
निरपेक्ष प्रेमामागे ना कुठला हेतू
कधी मन धरणारी, तर कधी कान धरणारी
कधी हक्काने रागावणारी, तर कधी लाडाने जवळ घेणारी
बहिणीचा रुसवा जणू खेळ उन सावलीचा
भरलेले डोळे पुसाया आधार माय माउलीचा
कुठल्याच नात्यात नसेल एवढी या नात्यात ओढ आहे
म्हणून बहिणीचं नातं चिरंतन गोड आहे
भरलेलं आभाळ रितं कराया तिचीच ओंजळ पुढे येई
जागा जननीची भरून काढण्या निर्मिली आई नंतर ताई
4 thoughts on “Nata Bahinicha Sister Poem In Marathi”
nice
i love my sister
Sundher?
Very nice.. ..