Mogara Phulala Mi Marathi Serial Title Song

दंवबिंदूचा आभाळाशी जणू दुवा जुळला
क्षितिजावर लालिमा हसली… मोगरा फुलला

नवा नवा भासतो चेहरा आज मला अपुला
हा नजरेचा कौल अनोखा… मोगरा फुलला

घरट्यातून पाखरें उडाली, किरणांची रांगोळी सजली
तरूण आशा अन्‌ स्वप्‍नांनी दिवसांची ओंजळ भरलेली

एक कवडसा असा झळकला… मोगरा फुलला
हात तुझा हातात गुंफला… मोगरा फुलला

कुठे हे सुखाचे घरटे आहे, अवघे जीवन शोधू पाहे
जिथे मनाला मिळे विसावा खरे सूख ते तिथेच आहे

जुनेच घरकुल त्याचा मजला अर्थ नवा कळला
हाक दिली अन्‌ साद मिळाली… मोगरा फुलला

विणला जावा तनामनाचा नाजूक सुंदर गोफ दुहेरी
जसे चांदण्यावर कोरावे रुणझुणते ऊन हे सोनेरी

जगणे आहे रंगबिरंगी इंद्रधनुचा झुला
क्षितिजावर लालिमा हसली… मोगरा फुलला

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *