Mi Paisa Boltoy मी पैसा बोलतोय

mi-paisa-boltoy

सर्वात आधी मी तुम्हाला माझा परिचय करून देतो, मी आहे पैसा. माझं रूप साधारण आहे पण जगाला व्यवस्थित ठेवण्याची क्षमता माझ्यात आहे. मनुष्याची नियत आणि प्रकृती बदलण्याची क्षमताही माझ्यात आहे कारण मनुष्य मला आदर्श समजतो.

आहो काही लोक तर माझ्यासाठी आपली जात, धर्म सोडतात, आपल्याच लोकांना धोका देतात, आपलाच आत्मसन्मान गहाण ठेवतात. आहो एवढंच नाही तर माझ्यासाठी आपला देह विकतात. लक्षात ठेवा मी चांगल्या आणि वाईट गोष्टींमध्ये कधीच फरक करत नाही, परंतु लोक मला स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी वापरतात.

मी राक्षस नाही पण लोक माझ्यासाठी अपराध करतात. हे सत्य आहे कि मी देव नाही पण लोक माझी देवाप्रमाणे पूजा करतात. खर तर मी लोकांच्या सेवेसाठी आहे पण लोकच माझे गुलाम झाले आहेत.

मी कधी कुणासाठी त्याग नाही केला पण लोक माझ्यासाठी स्वतःचाही जीव देतात तर कधी दुसर्याचा जीवही घेतात. मला तुम्हाला काही गोष्टी लक्षात आणून द्यायच्या आहेत, सांगायच्या आहेत….

  • मी तुमच्यासाठी घर विकत घेऊ शकतो पण तुमच्या घरात घरपण नाही आणू शकत.
  • मी तुमच्यासाठी औषध आणू शकतो पण तुमचे वय नाही वाढवू शकत.
  • मी तुमच्यासाठी घड्याळ विकत घेऊ शकतो, पण गेलेली वेळ नाही.
  • मी तुमच्यासाठी मोठे पद विकत घेऊ शकतो, पण आदर नाही.
  • मी तुमच्यासाठी मखमली गादी विकत घेऊ शकतो, पण शांत झोप नाही.
  • मी तुमच्यासाठी पुस्तके विकत घेऊ शकतो, पण विद्या नाही.
  • मी तुमच्यासाठी रक्त विकत घेऊ शकतो, पण कोमेजून जात असलेले जीवन नाही.

म्हणून लक्षात ठेवा पैसा हे सर्वस्व नाही. पैसा हे सर्वस्व नाही. पैसा जरूर कमवा पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका. पैश्याची पूजा जरूर करा पण पैश्याचे गुलाम बनू नका. माणसासाठी पैसा बनला आहे, पैश्यासाठी माणूस नाही.

आपले कुटुंब, आपले नातेवाईक, आपले मित्र परिवार आप्तेष्ठ हेच आपले धन आहे. त्यांना जाणीव पूर्वक जप, कारण जेव्हा तुम्हांला देवाचं बोलावणं येईल तेव्हा मी तुमच्या सोबत नाही येऊ शकणार. तुम्ही केलेला परोपकार, दुसर्यांना दिलेला आनंद, मातृ पितृच भक्ती, त्यांची सेवा व देशसेवा हेच खरं तुमचे धन आहे, तेव्हा सेवा, साधना व सत्संग करा.

मग आयुष्यात तुमच्यासारखे सुखी कोणीही नसणार…

Liked it? Share with your friends...

You May Also Like

One thought on “Mi Paisa Boltoy मी पैसा बोलतोय

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *