Marathi Suvichar Sangrah

गरिबी ही नम्रतेची परीक्षा व मित्रतेची कसोटी असते


निराशावादी धनवानापेक्षा आशावादी गरीब अधिक सुखी असतो – हरिभाऊ उपाध्याय


गरिबीत वाटणारे समाधान हे खऱ्या श्रीमंतीचे लक्षण आहे


ज्याच्याजवळ पैशाशिवाय दुसरे काहीच नाही त्याच्याइतका अधिक गरीब दुसरा कोणीच नाही


ईश्वर गरीब मनुष्याला गरीब ठेवून त्याच्यात हिम्मत आहे की नाही याची कसोटी घेत असतो – विनोबा भावे


धनवान असूनदेखील ज्यांची धनाची लालसा कमी होत नाही; ते सर्वात अधिक गरीब आहेत – महात्मा गांधी


गरिबीचे प्रदर्शन करणे, हे गरिबीचे दुःख भोगण्यापेक्षाही अधिक कष्टदायक आहे – प्रेमचंद


Marathi Suvichar for Facebook


कीर्ती म्हणजे कधीही न शमणारी तृष्णा आहे – प्रेमचंद


कीर्ती हे उद्योगाचे सुंदर स्वप्न आहे पण पैसा ही आजची भाकरी आहे – साने गुरुजी


यशाचा कीर्तीचा मार्ग स्वर्गाच्या मार्गाइतकाच कष्टदायक आहे – स्टर्न


यश त्यागाने प्राप्त होते दगाबाजीने नाही – प्रेमचंद


मारावे परी कीर्तिरूपे उरावे – समर्थ रामदास


क्रोध ही दुर्बलतेची निशाणी आहे – दयानंद सरस्वती


क्रोधाच्या सिंहासनावर बसताच बुद्धी तेथून निघून जाते – एम. हेन्री


जेव्हा क्रोध नम्रतेचे रूप धारण करतो; तेव्हा अभिमानही त्याच्यापुढे नतमस्तक होतो – सुदर्शन


जो मनुष्य आपल्या मनाची वेदना – मनातील दुःख स्पष्टपणे दुसऱ्यांना सांगू शकत नाही त्याला अधिक राग येत असतो – रवींद्रनाथ टागोर


क्रोधी बनून पापाचे भागीदार बनण्यापेक्षा पापाविषयी राग येऊ द्या – सेकर


Best Thoughts in Marathi


देव सज्जनांचा मित्र, शहाण्यांचा मार्गदर्शक, मूर्खांचा जुलूमशहा आणि वाईटाचा शत्रू असतो


नास्तिक लोकांच्या मते ईश्वर म्हणजे शून्य आहे व आस्तिक लोकांच्या मते ईश्वर म्हणजे पूर्णविराम आहे – स्वामी समर्थ


ईश्वर निरंकार आहे; परंतु तो भक्तांच्या आर्ट प्रार्थनेनुसार स्वतःच्या शक्तीने वेगवेगळी रूपे धारण करीत असतो – दयानंद सरस्वती


ईश्वर एकच आहे परंतु ईश्वराचे भक्त त्याचे वेगवेगळे वर्णन करीत असतात


मोठमोठी कामे केवळ ताकदीने होत नाहीत तर ती सहनशक्तीने होतात – जॉन्सन


कोणतेही काम निष्ठापूर्वक करा, कीर्ती तुमच्या मागे धावत येईल – सायरस


तुम्हाला मान खाली घालावी लागेल असे एकही काम करू नका – जेम्स एलन


मनुष्याच्या रुपामुळे किंवा कुलमुळे त्याचा गौरव वाढत नाही. माणसाच्या कार्यामुळे, त्याच्या कर्तुत्वामुळेच त्याचा गौरव वाढत असतो – पंचतंत्र


प्रत्येक चांगले कार्य सुरु करण्यापूर्वी प्रथम ते असंभव वाटते


क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे – समर्थ रामदास


कर्म म्हणजे कामधेनू आहे ज्याला दोहन करता येते त्याला आनंदरूपी दूध प्राप्त होते – वल्लभाचार्य


Marathi Good Thoughts


आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे – गौतम बुद्ध


काम करून माणूस कधी मरत नसतो, तो आळशीपणाने मारत असतो – इतिहासाचार्य राजवाडे


आळसाने खंगून जाण्यापेक्षा श्रम करीत झिजून जाणे अधिक चांगले – इमर्सन


आळसात आरंभी सुख वाटते पण त्याचा शेवट दुःखात होतो


आळसावर मात करून जीवनाच्या मैदानात निश्चयाचा झेंडा जो रोवितो तोच यशस्वी होतो – यदुनाथ थत्ते


आळस हा शरीराला व मनाला मिळालेला शाप आहे – बर्टन


आळसाची गती अत्यंत मंद असते; त्यामुळे गरिबी लगेच माणसाच्या गळ्यात पडते


Thoughts in Marathi


खरा आनंद दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो – स्वामी रामतीर्थ


प्रसन्न वृत्ती असणाऱ्याची बुद्धी लवकर स्थिर होत असते – श्रीमदभगवतगीता


प्रसन्नता हे ईश्वराने दिलेले औषध आहे – स्वेट मॉर्डन


आनंदी माणूस दीर्घायुषी असतो – शेक्सपिअर


आनंदी वृत्ती आणि समाधान ही फार मोठी सौंदर्यवर्धक साधने आहेत


आनंदी वृत्ती हा आरोग्याचा आधार आहे तर औदासीन्य हे रोगाचे घर आहे – हेली बर्टन


प्रसन्नता सर्व सद्गुणांची जननी आहे


कोणताही भार आनंदात उचलला की तो हलका होतो – ओविद


पराक्रमाचा अभिमान असावा; पण उन्माद नसावा – वि. स. खांडेकर


सत्याच्या प्रतिष्ठेसाठी असत्याचा विध्वंस करावा लागतो


प्रार्थना हाच अहंकार नाशावर उपाय आहे – महात्मा गांधी


अभिमानाने अलग राहाल तर माराल – साने गुरुजी


जेव्हा अहंकार नष्ट होतो तेव्हाच आत्मा जागृत होतो – न्या. रामकेशव रानडे


Good Thoughts in Marathi


असत्याची अनेक रूपे असतात; तर सत्याचे फक्त एकच रूप असते – रुसो


असत्याचा विजय झाला तरी तो क्षणभुंगर असतो – लिओनार्ड


जो मनुष्य खोटे बोलायला घाबरतो; तो इतर कशालाच घाबरत नाही – फ्राऊड


संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून मागा कारण संकट थोड्या वेळासाठी असतं पण उपकार आयुष्यभर राहतात


आपण फुशारकीने इतरांना सांगतो नेहमी खूष राहत जा पण त्याचा रस्ता पण दाखवा


मी त्या नशिबाचे सगळ्यात आवडीचे खेळणे आहे, जे रोज मला जोडते ते परत तोडून टाकण्यासाठी


ज्या घावातून रक्त निघत नाही, समजून जा तो घाव कोणी आपल्यानेच केला आहे


हरवलोय आपण स्वतः आणि देवाला शोधतोय


गर्व करून कुठल्या नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा


मोठं काम करण्याचा एकच मार्ग आहे, जे काम करत आहात ते प्रेमाने करा – ऐपी जे अब्दुल कलाम


Suvichar in Marathi


दुसऱ्याच्या सावलीत तुम्ही स्वतःची सावली कधीच बनवू शकत नाही, त्यासाठी एकट्याला उन्हात उभे राहावे लागते – बाबा आमटे


अशक्य काहीच नसतं, आयुष्यात नशिबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग ९९ टक्के असतो


जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढेच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर माफ करा


भिंतीचा शोध लागला आणि कळपात राहणारा माणूस कुलुपात राहू लागला


मानवाचा दानव होणे ही त्याची हार
मानवाचा महामानव होणे हा त्याचा चमत्कार
आणि मानवाचा “माणूस” होणे हे त्याचे यश आहे


नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे


धर्म हा माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही.
कोणताच धर्म माणसापेक्षा मोठा असूच शकत नाही.
जो धर्म भेद शिकवतो तो मुळात धर्म नसून आजार आहे.


 

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *