Marathi SMS Messages for Mother

आयुष्याच्या वळणावर तूच होती सोबत … ती म्हणजे माझी आई


एकदा फुललेले फुल पुन्हा फुलत नाही
एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही
हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण
आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई बाप पुन्हा मिळणार नाहीत


देवाची पूजा करून आई मिळवता येत नाही, पण आईची पूजा करून देव मिळवता येतो


डोळे मिटुन प्रेम करते ती प्रियसी
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती मैत्रिण
डोळे वटारुण प्रेम करते ती पत्नी आणि
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती फक्त आई


बायकॊच्या पदराला तॊड पुसले तर बायको म्हणते पदर खराब होईल.
पण आईच्या पदराला तोंड पुसले तर आई म्हणते बाळा पदर खराब आहे
देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून त्याने निर्माण केली ‘आई’


पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म जो तुझ्या गर्भात घेतला
जग पाहिलं नव्हत तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला


दु:खात हसवी, सुखात झुलवी, गाऊनी गोड अंगाई.
जगात असे काहीही नाही, जशी माझी प्रिय आई.
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या ह्रदयी.
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला मझी “आई”.


आई म्हणजे मायेचा पाझर, आईची माया एक आनंदाचा सागर
आई म्हणजे घराचा आधार, आई विना ते गजबजलेले घरच असते निराधार


WhatsApp Status for Mother in Marathi


सर्व गुन्हे माफ होणारे जगातील एकमेव ठिकाण म्हणजे – आईचे हृदय


तुमच्या आईला माझ्याकडून धन्यवाद सांगा कारण
तिने माझ्यासाठी छान आणि जीवाला जीव देणारे मित्र या जगात आणले


घर सुटत पण आठवण कधीच सुटत नाही, जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही
सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात, शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात


“आ” म्हणजे “आत्मा”, “ई” म्हणजे ईश्वर (परमात्मा)
आत्मा व परमात्मा यांचे एकरूप ती आई


Mothers Day SMS Messages


सकाळी दोन धपाटे घालून उठवते ती आई, उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते ती आई
नाश्त्या नंतर डब्याची चिंता सुरु करते ती आई, काय करीन ते घेऊन जा म्हणताना सगळं आवडीचे करते ती आई
पदराला हात पुसत सांभाळून जा म्हणते ती आई, परतीची आतुरतेने वाट बघत असते ती आई
आपण झोपत नाही तोवर जागी असते ती आई, आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य अपूर्ण ती फक्त आईच


खिशातल्या हजार रुपयांची किंमत सुद्धा लहानपणी आईने गोळ्या खाण्यासाठी दिलेल्या एक रुपयापेक्षा कमीच असते..


आई कोणिच नाही गं येथे आधार मनाला देणारं
सर्व चुका माफ करुन तुझ्यासारख प्रेमान जवळ घेणारं
आई कोणीच नाही गं माझं आसरा मनाला देणारं
मायेन रोज कुशित घेऊन झोपणारं


एका मुलाने ब्रेकअपच्या वेळी केलेलं वक्तव्य…
“माझं प्रेम तु जरी मान्य केल नाही तरी मी तुझ्यासाठी जीव नाही देणार.
तुला दुसरा मुलगा जरूर मिळेल, पण माझ्या आईला पुन्हा मी मिळणार नाही”


तुझ्या अपरंपार कष्टाच आज बीज होऊ दे, डोळे मिटून बसलेल्या नशिबाचे आज चीज होऊ दे
तु पार केलेस डोंगर दुखाचे, पाखरांच्या पोटात जाळ होऊ दे
किती सहन केलस आयुष्य यातनांचं, आज मला तुझं आभाळ होऊ दे.


Aai Marathi Status


आई ही एकमेव व्यक्ती आहे जी तुम्हाला इतरांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखत असते


दुःखाचा डोंगर कोसळलेला असो, कि सुखाचा वर्षाव होत असो,
मनाला चिंतेचे ग्रहण लागलेले असो, कि आठवणीचे तारे लुकलुकत असो, आठवते ती फक्त “आई”


जेव्हा एखाद्याच्या घरी भाकरीचे चार तुकडेच आहेत आणि खाणारी तोंडे पाच आहेत,
तर त्या घरातील एकच व्यक्ती मला भूक नाही असे म्हणते, ती म्हणजे “आई”


आईच्या गळ्याभोवती तिच्या पिल्लाने मारलेली मिठी
हा तिच्यासाठी नेकलेस पेक्षाही मोठा दागिना आहे


हृदयाच्या मखमली पेटीत ठेवण्यासारखी दोन अक्षरे ती म्हणजे “आई”


परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी राहणे शक्य नव्हते म्हणून प्रत्येकाला आई दिली


“आई”, दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा ही तीचा भासे जणू गोड गाणी,
वादळ, वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई


Happy Birthday Wishes to Mother in Marathi


आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणझे आई..
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..


आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या…
१. तुम्ही जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हरत राहिले ते बाबा
२. तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती आई
Happy Birthday Aai


माझ्या विषयी सांगताना तुला विसरणे शक्य नाही
तुझ्या उल्लेख शिवाय माझी ओळख पूर्ण नाही
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई
Happy Birthday Mom


घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने, आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने
तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा, प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा
माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस, माझ्यावर खूप प्रेम करतेस
तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला, खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला


Happy Birthday Aai in Marathi


हात तुझा मायेचा असुदे मस्तकावरी, झेलेन आव्हाने सारी, फिरुनी जीवन वारी
पिंजून आकाश सारे,दणकट पंखावरी, स्पर्श तुझा वात्सल्याचा,स्मरुनी जन्मांतरी
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आई, दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!
Aai, Happy Birthday


पहील्या नजरेतील प्रेमावर माझा विश्वास आहे..

कारण, जेव्हा मी पहिल्यादा डोळे उघडले होते, तेव्हापासुनचं आईच्या प्रेमात आहे..

Happy Birthday Aai


Marathi Quotes for Mother


स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी


Best Marathi Messages to show your gratitude and love towards your mom! Majhi Aai!

Aai || Mother || Maa

In this one word, essence of the whole sky is covered,
In this one word, even the earth could fit,
She is considered as your constant and unconditional lover
One hug from her and your entire world is lit!

Only a mother can love like this, with zero expectations of anything in return. Her love is the purest and has no conditions.

Here, we have all messages, quotes and SMS for Aai, and that too in Marathi language. Show your love towards your mom with these beautiful Marathi messages for Mother. Of course, there’s no way to repay your mom for what she does day in and day out, but a sweet little gesture, as small as a message, can let her know what she really means to you.

So wish your mother for all her commitment and love she has conferred on you for years and asked nothing for in return. Every mother is special in her own unique way. So it is time to make your ‘Aai’ happy with some messages for her birthday or mother’s day or to express your thank you.

Be it emotional or touching messages that make your mother all senti, or fun-loving quotes that make her laugh; we have them all. We also have Birthday wishes in Marathi for Mother that will make her feel special and honored!

So it is time now to extend your gratitude towards your Aai, and send her a lovely SMS message every day, as we have many of the msg for mother in Marathi… And once your mother is happy and has a smile on her face, you know whom to thank – Marathi Planet!

We also have great Mothers’ Day Messages in Marathi to sway your moms away, or to be put on Facebook and WhatsApp as statuses! Pick out the best SMS messages in Marathi for your mom and just copy them to paste anywhere you want!

Go on, make your mom the happiest!

Liked it? Share with your friends...

One thought on “Marathi SMS Messages for Mother

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *