Marathi SMS Messages for Father

बाबांचा मला कळलेला अर्थ…
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन,
स्वतः च्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झ़टणार अंतःकरण…


बाबांचा मला कललेला अर्थ…
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर
अपरिमित काळजी करणारं मन आणि
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन मुलांसाठी झटणारे अंत:करण


Marathi Status on Father


बाप असतो तेलवात जळत असतो क्षणा क्षणाला, हाडांची काडे करून आधार देतो मन मनाला


एक लहान मुलगी आपल्या वडिलांबाबरोर एका पुलावरून जात होती. पाणी खूप वेगाने वाहत होतं
वडील: बाळा, घाबरू नको, माझा हात पकड
मुलगी: नाही बाबा, तुम्ही माझा हात पकडा
वडील: (हसत): दोघांमध्ये काय फरक आहे बाळा?
मुलगी: जर मी तुमचा हात पकडला, अन अचानक काही झालं, तर मी तुमचा हात सोडून देऊ शकते. पण मला माहितीये की काहीही झालं तरी तुम्ही माझा हात कधीच सोडणार नाही!


कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा, शांत प्रेमळ कठोर रंगीत बहुरूपी बाबा


Father Messages in Marathi


चट्का बसला, ठेच लगली, फटका बसला तर “आई गं” हा शब्द बाहेर पडतो, पण
रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक दाबतो तेव्हा “बाप रे!” हाच शब्द बाहेर पडतो.
छोट्या संकटासठी आई चालते पण मोठमोठी वादळं पेलताना बापच आठवतो


आयुष्यात या दोन व्यक्तींची खूप काळजी घेतली पाहिजे
एक – तुम्ही जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हरत राहिले ते तुमचे बाबा
आणि दुसरी – तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती आई


Baba MSG in Marathi


आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा पण कोणत्याही गोष्टींसाठी आई वडिलांना सोडू नका


बाप बाप असतो, तो काही शाप नसतो. तो आतून कँनव्हास असतो
मुलासाठी राब-राब राबतो, बुडणार्या सुर्याकडे उगाच पाहत बसतो
पायाच्या नखानी माती उकरत असतो, शेवटी सर्वानीच साथ सोडली असते,
पाखरं घर सोडून दुर निघुन गेलेली असतात, बाप मात्र आपल्या पाखराची वाट पाहत बसतो


“बाबा” एकमेव माणूस जो माझ्यावर स्वतः पेक्षा जास्त प्रेम करतो!


Thought on Father in Marathi


आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट आई बाबांच्या चेहऱ्यावरील सुखद हास्य आणि त्याच कारण तुम्ही स्वतः असणं


वडील म्हणजे एक अशी व्यक्ती…
जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता
तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता
आणि तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता


आपले चिमुकले हात धरून जे आपल्याला चालायला शिकवतात ते बाबा असतात
आपण काही चांगले केल्यावर जे अभिमानाने सगळ्याना सांगतात ते बाबा असतात
माझ्या लेकराला काही कमी पडू नये यासाठी जे कष्ट घेतात ते बाबा असतात
आयुष्याच्या रस्त्यावर चालताना जे आपल्याला चुकताना सावरतात ते बाबा असतात
आपल्या लेकराच्या सुखासाठी जे आपला देह ही अर्पण करतात ते बाबा असतात


View Marathi Kavita On Father

Liked it? Share with your friends...

One thought on “Marathi SMS Messages for Father

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *