Sasu Sun Jokes SMS

बाहुबली २ पाहीला आणि कळलं की कटप्पा वगैरे काही नाही, शेवटी सासु सुनेच्या भांडणात नवऱ्याचा विनाकारण बळी जातो
घरोघरी मातीच्या चुली । फुकटचा मेला बाहुबली।।


आताच दोन सासूंमधील संभाषण ऐकले… माझी नवीन सून म्हणजे अगदी हजाराची नोट आहे हो…
काही कामाची नाही…


पुणेरी सुनेचा मार्मिक टोला, “आमच्या सासूबाईंना ना “Heavy Diabetes” आहे. पण संयम बघा रक्तातली साखर कधीही ओठावर आली नाही”


सुनबाई : सासूबाई मी तुम्हाला मदत करू का?
सासूबाई : का गं??? नेट पॅक संपला वाटतं


घर आवरताना सासूला सुनेचा Bio data सापडला जो लग्नासाठी तयार केलेला होता
त्यात आवड या सदरा मध्ये “स्वयंपाक करण्याची भयंकर आवड आहे” असे लिहीले होते
सासूबाईंनी त्यात दुरुस्ती केली – “भयंकर स्वयंपाक करण्याची आवड आहे”


सखुबाई : तुझी सून कशी आहे?
बकुबाई : काय सांगू बाई, माझ्या पोराला बैल बनवलं आहे. माझा पोरगा तिच्यापुढे पाणी भरतो, घर झाडतो, चहा करून देतो आणि मग ती उठते
सखुबाई : आणि जावई कसा आहे?
बकुबाई : जावई देव माणूस आहे…. पाणी भरून देतो, झाडू मारतो, चहा करून देतो. माझी पोरगी सुखात आहे. जावई भलताच देव माणूस आहे


नवीन लग्न झालेल्या सुनेला सासू म्हणते : आजपासून तू मला आई म्हणायचं आणि सासर्यांना बाबा म्हणायचं
संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा घरी येतो तेव्हा ती म्हणते : आई, दादा आला.


सासूबाई : अगं सुनबाई, तो पानावर लाल लाल चिकट पदार्थ काय आहे?
नवीन सुनबाई : मला मैत्रिणीने सांगितले, वाणासाठी जर कोणाला ५ फळं मिळाली नाहीत तर त्यांनी पूजेसाठी मिक्स जॅम वापरला तरी चालतो
सासूबाई चक्कर येऊन पडल्या… पूजा वही, सोच नायी


सुनबाई पुस्तक पाहून स्वयंपाक करत असते
सासूबाई : काय गं, फ्रिज मध्ये देवघरातील घंटा का ठेवली?
सुनबाई : पुस्तकात लिहिलंय “इन सब का मिश्रण बनाकर फ्रिज में एक घंटा रखिये”
ससु कायमची वारीला निघून गेली


सुनबाई : सासूबाई मी तुम्हाला मदत करु?
सासूबाई : का गं, नेट पँक संपला वाटत?


सासूबाई : देवाने तुला चांगले २ डोळे दिलेत ना? तांदुळातले २-४ खडे सुद्धा काढता नाही येत काय तुला?
सुनबाई : देवाने तुम्हाला चांगले ३२ दात दिलेत ना… मग तुम्हाला खाताना २-४ खडे खाता येत नाही का??


 

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *