Marathi Sad SMS Messages

नशिबापेक्षा जास्त भरोसा केला होता काही लोकांवर
पण ते एवढे बदलले जेवढं नशीबही बदलणार नाही


वृद्धाश्रमात आई वडिलांना सोडून तो पलटतच होता की वडिलांनी आवाज देऊन सांगितलं,
बाळा, आपल्या मनात कोणत्याही प्रकारचे ओझे ठेऊ नकोस
तुला मिळवण्यासाठी दोन मुलींची हत्या केली होती, शिक्षा तर मिळणारच होती


आयुष्यात रडण्यासाठी माझ्या कड़े खूप काही गोष्टी आहेत
पण हसण्यासाठी फक्त तु आहेस
जर तूच सोडून गेलीस तर मी हसायचं कसं?


डोळ्यात अश्रु देऊन कोण गेले, ओठात हास्य ठेउन कोण गेले
फक्त सोबतीला माझ्या दुःख होते पुरे आता तुजे सांत्वन
ओठात शब्द पण, मुके होऊं गेले


तुझ्या पासून दुरावल्याने पाऊसही बघ उभा पेटतो
केविलवाण्या नजरेने तो तुला फक्त स्वप्नात भेटतो


डोळ्यात दिसणारे भाव डोळे मिटताच लपले
असेच काही भाव तिने कळु न देता जपले


तिच्या अपसुक जाण्याने तर, मग शब्द पण माझे साथ देत नाहीत
पुन्ह पुन्हा मनाला समजावून पण ठोके हृदयाचे थांबत नाहीत


दिवसभर माणसांची वर्दळ असणारा मनाचा रस्ता रात्री मात्र एकाकी पडतो
पहाटे पक्षांची किलबिल कानी पडेपर्यंत निमुटपणे स्वतःच्या एकांताशी लढतो


सगळीच स्वप्न पूर्ण होत नसतात ती फक्त पहायची असतात
कधी कधी त्यात रंग भरायचे असतात पण स्वप्न पूर्ण झाले नाही तर दु:खी व्हायचं नसतं
रंग उडाले म्हणून चित्र फाडायच नसतं, फक्त लक्षात ठेवायचं सर्वच काही आपलं नसतं


बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्या पर्यंत न पोहचण ही शोकांतिका जास्त भयाण.


ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते.


Sad Marathi Status for WhatsApp


Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *