होकार तर कळला, पण बंधनांचं काय?
हृदयाचं ठीक, पण स्पंदनांचं काय?
उत्तर माझ्या प्रश्नाचं दिलंच नाहीस तू
पण ओळखून घ्यावं मी असं हळूच हसलीस तू
भावना ओंजळीत घेऊन जगू नका त्या व्यक्त करण्यात मजा आहे
डोळ्यात अश्रू नेहमीच येतात ते पुसून हसण्यात मजा आहे
तुजशी बोलता पावलं वळतात वाट वळायच्या आधी
आणि मलाच कळत नाही मी तुझ्यापाशी पोहोचलो कधी?
मी इथे आहे पण माझे मन तिथे आहे
आणि तू तिथेच आहेस पण मी तुझ्या मनात आहे
शब्ध ओठांवर येत नाहीत भावना आतून आल्या शिवाय
काळत नाही त्याची वेदना त्याच्या जागी गेल्या शिवाय
हृदयात नेहमीच तुझ्यासाठी थोडी जागा जपून ठेवतो
कधीतरी येशील म्हणून त्या जागेवर फुले पांघरून ठेवतो
Marathi Propose Kavita
मला तिला प्रपोज करायचाय कसे करू समजतच नाही
मला तू खूप आवडतेस म्हणू की माझे तुज्यावर खूप प्रेम आहे म्हणू?
मला तिला सांगायचंय खूप सुंदर दिसतेस तू कसे सांगू कळतच नाही
माझ्या स्वप्नातली परी म्हणू की स्वर्गातली अप्सरा म्हणू?
मला तिच्यावर कविता लिहायचेय कसे लिहू उमजतच नाही
तू फक्त माझी म्हणू की मी फक्त तुझा म्हणू?
मला तीचाशीच लग्न करायचंय कसे करू समजतच नाही
साथ जीवनभर देशील का म्हणू की तुज्या नावापुढे माझे आडनाव लावशील का म्हणू?
मला फक्त तीचासाठी जगायचंय कसे जगू मार्गच सापडत नाही
मी तुज्याशिवाय राहू शकत नाही म्हणू की तुज्याबरोबर जगणे फक्त प्रिय वाटते म्हणू?
म्हणू तरी काय म्हणू ?
कवी : UNKNOWN